भाजप तीस टक्के नगरसेवकांना घरी बसविणार..
Nitin Gadkari on NMCSarkarnama

भाजप तीस टक्के नगरसेवकांना घरी बसविणार..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा वाढदिवस साजरा करतानासुद्धा निवडणुकीच्या अजेंडा समोर ठेवूनच कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती.

नागपूर : महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली आहे. भाजप आणि कॉंग्रेस असाच सामना यावेळी होण्याची चिन्हे दिसत आहेत. कॉंग्रेसची तयारी जोरात सुरू आहे. भाजपच्या (BJP) गेल्या वेळच्या काही नगरसेवकांमुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता नेत्यांना दिसते आहे. त्यामुळे यावेळी अनेकांना घरी बसवावे लागणार आहे.

वर्षभरापासून निवडणुकीच्या मोडवर असलेल्या भाजपला सर्व्हेत नापास झालेल्या नगरसेवकांची नाराजी दूर करण्याची मोठी कसरत करावी करावी लागणार आहे. पक्षातर्फे दोन सर्व्हे करण्यात आले असून यात सुमारे तीस टक्के नगरसेवकांना घरी बसवावे लागणार आहे. ते निवडणुकीच्या काळात उपद्रवी ठरणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.

भाजपने यावेळी महापालिकेत १२० प्लसचे टार्गेट ठेवले आहे. त्याकरिता वर्षभरापासून मेळावे, संवाद सभा, शक्ती बूथ, बैठकांचा कार्यक्रम सातत्याने सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा वाढदिवस साजरा करतानासुद्धा निवडणुकीच्या अजेंडा समोर ठेवूनच कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घेतले. वयोश्री योजनेतूनही ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

हे सर्व करीत असताना पाच वर्षे निष्क्रिय राहिलेल्या आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झालेल्या नगरसेवकांमुळे पक्षाला धक्का बसू शकतो. याची जाणीव पक्षालासुद्धा आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर्गत बैठकांमध्ये ही नाराजी बोलूनसुद्धा दाखवली आहे. त्यामुळे निष्क्रिय नगरसेवकांचे तिकीट कापण्याशिवाय भाजपसमोर दुसरा पर्याय दिसत नाही. महापालिकेच्या निवडणुकीनंतर लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता गमावणे भाजपला परवडणारे नाही.

Nitin Gadkari on NMC
राजकारण तापलं! हार्दिक पटेलांना भाजप प्रवेशाआधी काँग्रेसनं पाडलं उघडं

गडकरींचा शब्द अंतिम..

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या निवडणुकीत सक्रिय राहणार आहेत. पक्षासोबतच त्यांच्यामार्फत एक स्वतंत्र सर्व्हे केला जाणार आहे. यात कोण नापास होतो आणि उत्तीर्ण हे महत्त्वाचे ठरणार आहे. गडकरी यांचे धक्कातंत्र सर्वांना ठाऊक आहे. त्यांचा शब्द अंतिम असतो. त्यानंतर त्यात कोणी हस्तक्षेप करीत नाही. मागील निवडणुकीच्यावेळी महाल प्रभागात शेवटच्या क्षणी मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे अनेक नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार धास्तावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in