Maharashtra : मुनगंटीवारांचा ‘तो’ कॉल, अन् दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश...

Mungantiwar : क्षणाचाही विलंब न लावता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोनवरून संपर्क साधला.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Sudhir Mungantiwar News : राज्याचा मंत्री म्हणून काम करीत असताना दुर्दम्य इच्छाशक्ती असेल, तर कुठलेही काम अशक्य नाही. पुढील महिन्यात महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीच्या परेडमध्ये समाविष्ट केला गेला नाही, ही बाब राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना अस्वस्थ करून गेली आणि त्यांनी थेट संरक्षण मंत्र्यांना कॉल केला आणि आपल्या चित्ररथाचा समावेश दिल्लीच्या परेडमध्ये झाला.

त्याचे असे झाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वावर पुढील महिन्यात दिल्लीत (Delhi) होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा (Maharashtra) चित्ररथ समाविष्ट नाही, ही बाब राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आली. आपले खाते आणि पर्यायाने राज्य कुठेच मागे असू नये, यासाठी सतत आग्रही असलेले मुनगंटीवार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने आढावा घेतला, कारणे जाणून घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना फोनवरून संपर्क साधला.

संरक्षण मंत्र्यांसोबत संभाषणात मुनगंटीवारांनी पोटतिडकीने महाराष्ट्राची बाजू मांडली. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या राजपथावर परेडमध्ये माझा महाराष्ट्र दिसला पाहिजे, अशी विनंती त्यांना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात आघाडी घेत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असून मराठवाडा मुक्ती संग्रामाचेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्ली येथील राजपथावरील परेडमध्ये समाविष्ट असावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी संरक्षण मंत्र्यांना केली.

Sudhir Mungantiwar
बावनकुळे, मुनगंटीवार म्हणतात, राज्यपाल कोणत्या संदर्भाने बोलले माहिती नाही..

मुनगंटीवार यांच्या विनंतीची दखल राजनाथ सिंह यांनी घेतली. दिल्ली येथील परेडमध्ये आता २६ जानेवारी २०२३ला महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. आज या संदर्भातील पत्र केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला पाठवले आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट करून घेतल्यामुळे आता आपल्या राज्याची संस्कृती देशभर पोहोचणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com