शपथविधीनंतर मुनगंटीवार यांचे प्रथम आगमन; कार्यकर्त्यांनी अशी केली स्वागताची तयारी...

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आज नागपूरहून चंद्रपूरकडे रवाना झाल्‍यानंतर दुपारी २.४५ वाजता जाम पुढील नंदोरी चौकात त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात येईल.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर ः चंद्रपूर जिल्ह्यातील बल्‍लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्‍येष्‍ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ९ ऑगस्‍ट रोजी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांचे आज प्रथमच चंद्रपुरात आगमन होणार आहे. त्‍यांच्‍या आगमनाप्रीत्यर्थ चंद्रपूर जिल्‍हा भाजप तसेच महानगर भाजप यांच्‍यावतीने स्‍वागत व सत्‍कार समारंभाचे आयोजन ठिकठिकाणी करण्‍यात आले आहे.

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आज नागपूरहून (Nagpur) चंद्रपूरकडे (Chandrapur) रवाना झाल्‍यानंतर दुपारी २.४५ वाजता जाम पुढील नंदोरी चौकात त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात येईल. त्‍यानंतर दुपारी ३.०० वाजता खांबाडा येथे, दुपारी ३.३० वाजता टेमुर्डा येथे, सायं. ४.०० आनंदवन चौक, सायं. ४.१५ नंदोरी, सायं. ४.४५ कोंढा फाटा, सायं. ५.०० भद्रावती, सायं. ५.२० घोडपेठ, सायं. ५.३० साखरवाही फाटा, सायं. ५.४५ मोरवा बसस्‍टॅन्‍ड चौक, सायं. ५.५० डी.एन.आर. ऑफीस पडोली, सायं. ६.०० पडोली चौक, सायं. ६.१५ शर्मा पेट्रोलपंप चौक पडोली येथे त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात येणार आहे.

चंदपूर महानगरात प्रवेश करताच सायंकाळी. ६.३० वाजता हॉटेल ट्रायस्‍टार नजीक स्‍वागत करण्‍यात येईल. त्‍यानंतर सायं. ६.४० एन.डी. हॉटेलजवळ, सायं. ६.५० जनता कॉलेजजवळ, सायं. ७.१० वरोरा नाका, सायं. ७.२० रेस्‍टहाऊस समोरील दर्गा, सायं. ७.३० संजय गांधी मार्केट, सायं. ७.४० प्रियदर्शिनी चौक, सायं. ७.५० जटपुरा गेट येथे लाडुतुला, रात्री ८.१५ छोटा बाजार चौक, रात्री ८.३० चर्चसमोर जयंत टॉकिज चौक, रात्री ८.५० बगीचा समोर, रात्री ९.०० लक्ष्‍मीनारायण मंदिर चौक, रात्री ९.१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असे स्‍वागत होत गांधी चौक चंद्रपूर येथे रात्री ९.२० वाजता भव्‍य जाहीर सभेला मंत्री मुनगंटीवार संबोधित करणार आहेत.

Sudhir Mungantiwar
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘किसानों के लिये, अब सरकार उतरी मैदान मे !’

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्‍वागतासाठी नागरिकांनी मोठ्या संख्‍येने स्‍वागत तसेच सत्‍कार कार्यक्रमात सहभागी व्‍हावे असे आवाहन भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, नामदेव डाहूले, संजय गजपुरे, कृष्‍णा सहारे, राजेश मुन, राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवि गुरनुले, अंजली घोटेकर, विशाल निंबाळकर, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर राहुल पावडे, संदीप आवारी, आशिष देवतळे, अल्‍का आत्राम आदी भाजप पदाधिका-यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com