Mungantiwar : हे निखालस असत्य आहे, येवढ्या मुरब्बी राजकारण्यांनी असं बोलावं, आश्चर्य वाटतं !

Fadanvis : फडणवीसांनी तेव्हाही सांगितलं होतं की, शरद पवारांचा आम्हाला आशीर्वाद आहे.
Sudhir Mungantiwar and Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar and Sudhir MungantiwarSarkarnama

Sudhir Mungantiwar and Sharad Pawar News : जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी २३ नोव्हेंबरला शपथविधी केला. तेव्हा एक गोष्ट निश्चितपणे स्पष्ट होती की, अजित दादा आमच्यासोबत होते. दादांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं की, राष्ट्रवादी काॅंग्रेस आमच्यासोबत आहे. फडणवीसांनी तेव्हाही सांगितलं होतं की, शरद पवारांचा आम्हाला आशीर्वाद आहे. असे असताना शरद पवारांसारखे ज्येष्ठ आणि मुरब्बी राजकारणी निखालस खोटं बोलतात, याचे आश्चर्य वाटते, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

केवळ राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शपथविधी करावा लागतो का, असा प्रश्न करीत आम्हालाही काही सामान्य ज्ञान आहे की नाही, अशी मिश्कील टिपणी मंत्री मुनगंटीवार यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या अशा प्रकारच्या निर्णयांमध्ये असं काही करण्याची गरज नाहीये. काॅंग्रेसचे ४४ सदस्य, राष्ट्रवादीचे ५४ आणि शिवसेनेचे ५६ सदस्य होते. यांनी एकत्रिपणे पत्र जरी दिलं असतं आणि राज्यपालांकडे जाऊन ओळख परेड केली असती, तर ओळख परेड करून त्यांचा शपथविधी करणं, हे राज्यपालांना गरजेचं होतं. तशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट उठवावीच लागते, असंही मुनगटीवार म्हणाले.

राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी आम्ही अजित दादांची विश्वसनीयता कमी केली, असं सांगणं योग्य नाही. हे सामान्य ज्ञान बिघडवण्याचे काम आहे. येवढे मुरब्बी राजकारणी जर असं सांगत असतील, की राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शपथविधी करावा लागतो. हे निखालस खोटं आहे. आजच त्यांना असं का बोलाव वाटलं, असं विचारलं असता, मुनगंटीवार म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) भविष्याचा वेध घेऊन बोलतात. माझा त्यांच्या बाबतीतला जो काही लहान मोठा अनुभव आहे, त्यावरून मी हे सांगू शकतो.

पवार साहेब आधी भाजप-राष्ट्रवादी सरकारच्या बाजूने होते. पण नंतर असा मतप्रवाह आला की, आपण जर भाजपसोबत गेलो, तर भविष्यात आपला मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. कारण भाजपचा स्पेस मोठा आहे. पण शिवसेनेसोबत जर गेलो, तर एक पक्ष महाराष्ट्रातून जोपर्यत संपत नाही, तोपर्यंत आपला पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये येऊ शकत नाही. मग पक्ष कोणता संपवायचा, तर त्यांना कदाचित असा वेगळा केला असावा.

Sudhir Mungantiwar and Sudhir Mungantiwar
Mungantiwar : बहुमत म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती नाही, 'त्यांच्या' दावणीला बांधलेल्यांचा पक्ष कसा होईल?

दुध आणि दही, अशी युती जर केली. तर दुधाचं अस्तित्व संपतं. दुध दह्यामध्ये बदलतं. त्याप्रमाणे शिवसेना (Shivsena) आणि कॉंग्रेसची (Cogress) युती जर केली, तर शिवसेनेचं पतन वेगाने होईल आणि झालंही तसंच. तेव्हा काही पत्रकारांनी मला जी माहिती दिली होती, त्यांना माझा सलाम आहे. कारण त्यांचं म्हणणं तंतोतंत खरं ठरले, असंही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com