Mungantiwar : ‘जय जय महाराष्ट्र...’चा निर्णय उत्तम, पण त्यातून एक कडवं का गाळलं ?

Ambadas Danve : राज्यगीतावर सभागृहात सर्वांनी भाषणं केले, पण...
Sudhir Mungantiwar and Ambadas Danve
Sudhir Mungantiwar and Ambadas DanveSarkarnama

Ambadas Danve on Jay Jay Maharashtra Song in Budget Session : शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून २४१ कोटी रुपये विमा शेतकऱ्यांना मंजूर झाला. पण दीड महिन्यानंतरही तो शेतकऱ्यांना मिळाला नाही. या विमा कंपन्यांची जिरवण्याची गरज आहे. पण सरकार अपयशी ठरत आहे, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ज सरकारवर बरसले.

आश्रमशाळांमध्ये ३००० रुपये विद्यार्थ्यांना पुरेसे नाहीत. डिबीटीद्वारे पैसे दिला जातात, ही चांगली गोष्ट आहे. खेड्यापाड्यांतून येऊन विद्यार्थी बाहेर ठिकाणी राहतात. त्यांना किमान ५ हजार रुपये अनुदान देण्याची गरज आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी सूचना दानवेंनी केली. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या दुर्दशेबाबतही त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. राजगडला दरवाजा लावण्याची परवानगी दबाव टाकून घ्यावी लागते. यापेक्षा दुर्दैव कोणते, असा सवालही त्यांनी केला.

विशालगडावर बाजीप्रभुंची समाधी कोपऱ्यात खितपत पडली आहे. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. किल्ल्याचे संवर्धन झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला, हे चांगले झाले. राज्यगीतावर सभागृहात सर्वांनी भाषणं केले, पण त्यातून एक कडवं का गाळले? कडवं गाळल्यामुळे त्या गीताची लिंक लागत नाही.

त्यातला मुख्य गाभाच घेतलेला नाही. त्याच कडव्यामध्ये सर्व नद्यांची नावं आहेत. हे गीत पूर्ण घेण्याची गरज होती, असे दानवे म्हणाले. सीमाप्रश्‍नावर सरकारच्या भूमिकेवर त्यांनी टिका केली. अभिभाषणात सीमा प्रश्‍नावर राज्यपालांनी (Governor) गोलगोल भूमिका सांगितली आहे.

Sudhir Mungantiwar and Ambadas Danve
Mungantiwar : घराणेशाहीच्या जोरावर राजकीय पक्ष ताब्यात ठेवता येणार नाहीत, याचा हा संकेत !

सीमेवर दरोडेखोरांचा उच्छाद..

लातूर जिल्ह्यातील वलांडी गाव कर्नाटकच्या सीमेवर आहे. येथील लोक त्रस्त झालेले आहेत. कर्नाटकातील दरोडेखोर येतात आणि लूटमार करू पुन्हा कर्नाटकच्या सीमेत निघून जातात. ते आपल्या पोलिसांच्या (Police) हाती लागत नाहीत अन् कर्नाटक (Karnatak) पोलिस त्यांच्यावर कारवाई करीत नाही. दरोडेखोरांमुळे दहशतीचे वातावरण आहे, असे सांगत ग्रंथालयाच्या बाबतीतही त्यांनी सरकारला सूचना केली. ग्रंथालयाच्या श्रेणी वाढवण्याची मागणी आहे. पण पूर्ण झाली नाही. ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

गोवंश धोक्यात..

गोवंशाच्या रक्षणासाठी सरकारकडे कार्यक्रम नाही. कन्हेरमध्ये ५५ गायी मेल्या. सरकार पाऊल उचलत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहे. तेलंगणात ८ दिवसापेक्षा जास्त कालावधी सातबारासाठी लागत नाही. पण आपल्याकडे त्यासाठीही चकरा माराव्या लागतात, असे दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com