Mungantiwar साहेब ! आम्ही ओळखीचे नसतानाही तुम्ही देवासारखे धावून आलात !

Gave life to a child : त्यांच्या तत्परतेमुळे हृदयाला छिद्र असलेल्या एका चिमुकल्याला जीवनदान मिळाले.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Minister Sudhir Mungantiwar News : जनतेप्रती जागरूक असलेल्या राजकीय नेत्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. अशीच संवेदनशीलता दाखवलीय राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री (Minister) सुधीर मुनगंटीवार यांनी. त्यांच्या तत्परतेमुळे हृदयाला छिद्र असलेल्या एका चिमुकल्याला जीवनदान मिळाले.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील पारस कमलाकर निमगडे या चिमुकल्याने पत्र लिहून सुधीर मुनगंटीवार ((Sudhir Mungantiwar) यांचे आभार मानले आहे. आठव्या वर्गात शिकणारा पारस एक दिवस भोवळ येऊन कोसळला. वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे समोर आले.

डॉक्टरांनी तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला पालकांना दिला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये कुठून जमवायचे, या प्रश्नाने कमलाकर निमगडे व त्यांच्या परिवाराच्या समोर यक्ष प्रश्न उभा ठाकला. पारसच्या पालकांनी ही बाब गावाचे उपसरपंच सुरेंद्र धाबर्डे आणि अमर बोडलावार यांना सांगितली. त्यानंतर निमगडे परिवारासह मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले.

मुनगंटीवार यांना ही बाब कळताच त्यांनी सहकाऱ्यांना सांगून पारसची शासकीय इस्पितळातून वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपासणीनंतर, सावंगी मेघे येथील रुग्णालयात पारसवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. पारसवर शस्त्रक्रिया पूर्ण होईस्तोवर मंत्री सुधीर मुनगंटीवार जातीने याकडे लक्ष ठेवून होते. शस्त्रक्रियेनंतर पारसची प्रकृती ठणठणीत झाली आहे.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar : '' आघाडी सरकारच्या काळात मीही अग्निपरीक्षा दिली..!'' सुधीर मुनगंटीवार असं का म्हणाले?

संकटकाळी देवासारखे धावून आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचे पारसने एक भावनिक पत्र लिहून आभार मानले. 'साहेब, आम्ही ओळखीचेही नसताना तुम्ही देवासारखे आमच्यासाठी धावून आलात. त्याबद्दल खूप खूप आभार. . ', अशा शब्दात पारसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पारसचे पत्र वाचल्यानंतर अनेकांचे समाधान व डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in