Sudhir Mungantiwar On Sanjay Raut: संजय राऊतांना गांभीर्याने घेणे; म्हणजे आठवा अजुबा, मुनगंटीवारांचा घणाघात...

Maharashtra Politics News: महाराष्ट्र ही हास्यजत्रा नसून काहीतरी गंभीर राजकारण झाल पाहीजे.
Sudhir Mungantiwar and Sanjay Raut
Sudhir Mungantiwar and Sanjay RautSarkarnama

Minister Sudhir Mungantiwar News : संजय राऊतांना गांभीर्याने घेणे, म्हणजे आठवा अजुबा आहे. त्यामुळे त्यांना तुम्हीसुद्धा गांभीर्याने घेऊन नका, असे म्हणत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांवर टिका केली. राजकारण गांभीर्यानं झालं पाहीजे. ऐवढं नाँनसिरीयस राजकारण महाराष्ट्राने कधी बघितल नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

भटक्या विमुक्त परिषदेच्या समारोपासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना तुरूंगात डांबण्याची संपूर्ण तयारी महाविकास आघाडी सरकारणे केलेली होती. त्यांना नोटीससुद्धा बजाविण्यात आली होती. मात्र त्यांना तुरूंगात डांबण्याचा प्रयत्न करणारेच आता खड्ड्यात गेले, असा गौफ्यस्फोट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

पवार साहेबांकडून ही अपेक्षा नव्हती..

मोठमोठे नेते जर अशाप्रकारे वक्तव्य करीत असतील तर त्यांनी संविधान वाचलं नसाव. जे संविधानिक पदावर राष्ट्रपती, राज्यपाल, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतील. त्यांच्यावर टिप्पणी करताना शब्दांचे संतुलन असणे तसेच अशा शब्दाचा उपयोग करणे योग्य नाही, जो शरद पवारांनी केला. अशा शब्दांचा उपयोग करायला लागलो तर नागरीकशास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. अशी अपेक्षा मला शरद पवार साहेबांकडून नव्हती. असे खरमरीत टीका मंत्री मुनमंटीवार यांनी शरद पवारांवर केली.

नाना पटोलेंनीधमकीची भाषा बोलू नये..

नाना पटोले यांनी कसब्याच्या निवडणूकीवरून पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून झेंडे, पोस्टर्सच्या वादावरून तुमच्या इंन्सपेक्टर्सना सांगा, त्रास देवू नका, मला आडव्या हाताने घेता येतं, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोलेंवर हल्ला चढवत नाना शिवसेनेसोबत राहून त्यांची भाषा बोलत आहेत. असो पण नाना भविष्यात कूठे प्रवेश करतील, माहिती नाही. पण नाना पटोले यांनी अशी धमकीची भाषा बोलू नये, असे मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar and Sanjay Raut
मुनगंटीवार कडाडले; वेकोलि अधिकाऱ्यांना म्हणाले, रहिवाशांना त्रास द्याल तर, याद राखा !

उध्दव ठाकरेंनी विश्वासघात करू नये..

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईच्या (Mumbai) कार्यक्रमात सांगीतले की मी उत्तर भारतीयांसोबत नाते घट्ट करायला आलो आहे. उद्धव ठाकरे यांनी केवळ उत्तर भारतीयांशी नव्हे, तर संपुर्ण देशाशी नाते घट्ट करावे. पण त्यांना टिकवून ठेवलं पाहिजे. विश्वासघात करु नये, असा टोला सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com