मुनगंटीवारांनी सांगितले, गुजरातचा सिंह महाराष्ट्रात, महाराष्ट्राचा वाघ जाणार गुजरातमध्ये!

बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी) जुनागढ येथे पाठविण्यात येणार आसल्याची माहीती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज दिली.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर आणि मादी सिंहांची जोडी (आशियटिक लॉयन) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी) जुनागढ येथे पाठविण्यात येणार आसल्याची माहीती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

गुजरातचे (Gujrat) वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा महाराष्ट्राचे (Maharashtra) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात आज अहमदाबाद (Ahamadabad) येथे चर्चा झाली. सदर प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांच्याकडून प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. ४ एप्रिल २०२२ रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी. मल्लिकर्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.

त्यावर सुधीर मुनगंटीवार आणि गुजरातचे राज्यमंत्री विश्वकर्मा यांनी आज विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी सर्वानुमते ठरले. आता केंद्राकडून मंजुरी मिळण्याचा अवकाश आहे. ती मंजुरी मिळाली की लगेच गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ जाणार गुजरातमध्ये पाठवण्यात येणार आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar
भव्य सैनिकी शाळा बघून केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, सुधीर मुनगंटीवार म्हणजे लाजवाब..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कित्येक वर्षांनंतर सर्वात वेगवान प्राणि चिता हा भारतात आणला. त्यानंतर आता गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार आणि बोरीवलीचा वाघ गुजरातमध्ये जाणार आहे. यासंदर्भात यापूर्वीच केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वनमंत्री मुनगंटवार सध्या गुजरातमध्ये अभ्यास दौऱ्यावर गेलेले आहेत. तेथे त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या सचिव अवंतिका सिंह यांना मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण असलेला राष्ट्रध्वज भेट दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com