Mungantiwar News : मेरा जीवन धन्य हो गया, असं मुनगंटीवारांना का म्हणाला आंध्रप्रदेशचा ‘तो’ अधिकारी?

Maharashtra : वनमंत्री म्हणून केलेल्या कार्याचे लखनौ येथे तोंड भरून कौतुक झाले.
Sudhir Mungantiwar at Uttar Pradesh
Sudhir Mungantiwar at Uttar PradeshSarkarnama

Mungantiwar was heartily praised : महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१४ ते २०१९ आणि विद्यमान सरकारमध्ये वनमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा गौरव देशपातळीवर केला जातो. आंध्रप्रदेशच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मुनगंटीवारांची मनापासून प्रशंसा केली. (This emotional incident happened while returning.)

सुधीर मुनगंटीवार यांना भेटून ‘मेरा जीवन धन्य हो गया..’, असे म्हणत आंध्रप्रदेशच्या या अधिकाऱ्याने त्यांची प्रशंसा केली. ‘आप के बारे मे आज तक बहुत कुछ सुना है. लेकीन आज आपको सुना भी है, देखा भी है और मिला भी है. मै आंध्रप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडल मे अधिकारी हू और आपसे ढेर सारी प्रेरणा लेकर यहां से जा रहा हू. जिसका उपयोग मेरे राज्य के लिये करुंगा...’, असे हा अधिकारी म्हणाला. मंत्री मुनगंटीवार यांनीही त्यांचे आभार मानत पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आयोजित नॅशनल क्लाइमेट कॉन्क्लेव १० आणि ११ एप्रिल, असे दोन दिवस आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम झाल्यानंतर परत निघत असताना हा भावनिक प्रसंग घडला. महाराष्ट्रात सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून केलेल्या कार्याचे लखनौ येथे तोंड भरून कौतुक करण्यात आले. त्या अधिकाऱ्याने केलेल्या कौतुकानंतर मंत्री मुनगंटीवारही भारावून गेले आणि त्यांचे आभार व्यक्त केले.

Sudhir Mungantiwar at Uttar Pradesh
Sudhir Mungantiwar News : सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, ''जागावाटपाचा फॉर्म्युला टीव्हीवर...''

या कॉन्क्लेव्हला केद्रीय ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री राज कुमार सिंह, केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन राज्यमंत्री अश्‍विनी कुमार चौबे, महाराष्ट्राचे (Maharashtra) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) उत्तराखंडचे वन, भाषा, निर्वाचन व तांत्रिक शिक्षणमंत्री सुबोध उनियाल, उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) वन, पर्यावरण, जन्तु उद्यान व जलवायु परिवर्तन राज्यमंत्री डॉ. अरुण कुमार सक्सेना, आणि उत्तर प्रदेशचे वन राज्यमंत्री के.पी. मलिक उपस्थित होते. लखनौच्या गोमतीनगरमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com