Sudhir Mungantiwar News: ‘अभ्यासू’ सदस्यांनी तर्कसंगत प्रश्‍न विचारावे, मुनगंटीवारांचा आमदार काळेंना टोला!

Vikram Kale: यामधील ४१ लाख झाडे लावलीच नाहीत.
Sudhir Mungantiwar and Vikram Kale
Sudhir Mungantiwar and Vikram KaleSarkarnama

Mumbai Legislative Council News : यापूर्वीच्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवड योजना राबवली होती. त्यांच्या उद्देश चांगला होता. पण मराठवाड्यात ४१ लाख झाडे लावलीच गेली नाही, असा आरोप आमदार विक्रम काळे यांनी केला. (Out of this, 41 lakh trees have not been planted)

यासंदर्भात बोलताना आमदार काळे म्हणाले, हा मंत्री मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मराठवाड्यात २ कोटी १२ लाख झाडे लावली. पण यामधील ४१ लाख झाडे लावलीच नाहीत. योजना तशी चांगली होती. पण अधिकाऱ्यांनी त्याला हरताळ फासला. या उपक्रमात मी स्वतःसुद्धा झालं लावली. पण मराठवाड्यात यामध्ये भ्रष्टाचार झाला. एकट्या मराठवाड्यात ही स्थिती असेल, तर सर्व ३६ जिल्ह्यांत स्थिती काय असेल, असा प्रश्‍न त्यांनी केला.

मराठवाड्याप्रमाणे हिशोब काढला तर राज्यभरात ३ कोटी झाडे गायब झाली आहेत. ३३ कोटींपैकी किती लागली, किती नाही आणि यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्‍न विक्रम काळे यांनी केला. यावर वनविभागाने ३३ कोटी वृक्षलागवड केली. तक्रारीनंतर नांदेड, लातूर, परभणी येथील अधिकाऱ्यांची चौकशी केली, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

आमदार काळे (Vikram Kale) पूर्ण उत्तर न वाचता आणि दोन विषय मिसळून गल्लत करीत आहेत. ते शिक्षक आमदार आहेत. त्यांच्यासारख्या अभ्यासू सदस्यांनी तर्कसंगत प्रश्‍न विचारला पाहिजे. नाहीतर शिक्षण क्षेत्रावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते, असे म्हणत मुनगंटीवारांनी त्यांना टोला लगावला. यासंदर्भात पुस्तिका वाटप केल्या आहेत. हे एक लोकआंदोलन होते. यामध्ये ४० विभाग समाविष्ट होते. दोन विभाग वन आणि आणि सामाजिक वनीकरण बाकी महानगरपालिका, (Municipal Corporation) नगरपालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्था होत्या.

Sudhir Mungantiwar and Vikram Kale
Mungantiwar News : ३३ कोटी वृक्षारोपण, उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवारांची खुली ऑफर !

४१ लाख झाडे लागलीच नसतील तर माहिती द्या. कपोलकल्पित आरोप करण्याचे कारण नाही. हे एक लोकआंदोलन आहे. यामध्ये अभिनेते सयाजी शिंदेंनी यांनी झाडे लावली. हे ईश्‍वरीय कार्य आहे, असे मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले. इको बटालियन विभागाने झाडांचे संवर्धन चांगल्या पद्धतीने केले. आर्मीचे निवृत्त लोक कडवटपणे झाडांचे संरक्षण करतात. ३५ वर्षानंतर ते निवृत्त होतात. नंतर इकोबटालीयनमध्ये काम करतात. त्याचा हा फायदा असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com