Mungantiwar News : ३३ कोटी वृक्षारोपण, उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवारांची खुली ऑफर !

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत येण्याची ऑफरच देऊन टाकली.
Uddhav Thackeray and Sudhir Mungaitiwar
Uddhav Thackeray and Sudhir MungaitiwarSarkarnama

Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray News : पूर्वीच्या सरकारमध्ये वनमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला होता. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी आणि विक्रम काळे यांनी आज सभागृहात केला. ही प्रश्‍नोत्तरी सुरू असताना वनमंत्री मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत येण्याची ऑफरच देऊन टाकली. (Uddhav Thackeray was offered to come with him again)

३३ कोटी वृक्ष उपक्रम सुरू करण्यात आला होता. मराठवाड्यात भ्रष्टाचार झाला. लागवड केलेल्या वृक्षांचे प्रमाण काय, असेही आमदार मिटकरींनी विचारले होते. यावर मुनगंटीवार म्हणाले, आकडेवारी दिलेली आहे. २०१९ मध्ये एक कोटी ७६ लाख ६९ हजार १५० झाले सामाजिक वनीकरण आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून लावले. त्यांपैकी ७६ टक्के झाडे जिवंत आहे. २०२१ मध्ये एक कोटी ६५ लाख एक हजार १४१ झाले लावली. यांतील ७५.५६ झाडे जिवंत आहेत.

महाफॉरेस्ट.गव्हरमेंट.इन या वेबसाइटवर याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. फोटो, व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. पर्यावरणाच्या कामात सदस्यांनीसुदधा सहभागी व्हावे, यासाठी तेव्हा जीआर काढला होता. नेमण्यात आलेल्या समितीचे विधानपरिषद सदस्य हे अध्यक्ष आणि विधानसभेचे सदस्य हे उपाध्यक्ष आहेत. या कामात कुण्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केलाही असेल तर त्याला सोडले जाणार नाही, असे मुनगंटीवार यांनी सभागृहाला सांगितले.

मेल्यानंतर जातानाही लाकूडच आपल्या कामी येणार आहे. त्यामुळे सदस्यांनी या कामी स्वतःला झोकून द्यावे, असा जीआर काढला. आता मी पुन्हा आवाहन करतो की, कुठेही गैरव्यवहार असेल तर सहन केला जाणार नाही. तीन महिन्यांत चौकशी झाली पाहिजे. पण खोट्या तक्रारींवर निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. स्वतः सदस्यांनी पर्यावरणाची जबाबदारी घ्यावी. वेबसाईटला भेट द्यावी. वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी हेच कामी येणार आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Uddhav Thackeray and Sudhir Mungaitiwar
Mungantiwar : मंदिरात जाऊन भजन करणाऱ्यांची संख्या वाढू नये, असं का म्हणाले मुनगंटीवार?

या लोकआंदोलनात ज्येष्ठ नेते शरद पवार, (Sharad Pawar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही झाडे लावली आहेत, असा उल्लेख त्यांनी केला. तेव्हा ‘उद्धवजींना मी तेव्हा सांगत होतो की, झाड सोडू नका, चांगली फळे येतील. एक नाही तर तीन वेळा यासाठी मी त्यांना भेटलो. पण त्यांनी ऐकले नाही आणि झाड सोडले. हरकत नाही... पण आताही वेळ गेलेली नाही’, असे मुनगंटीवार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर मी झाड लावण्याबाबत बोलत आहे, असे स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com