
Minister Sudhir Mungantiwar News : आमच्या पित्याने राजकीय पक्ष काढला म्हणून पक्षावर आमचा अधिकार आहे, असे होत नाही. उर्वरित दोन भावांचा अधिकार नाही का? ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे. एकुणच काय तर बाळासाहेबांचा वारसा चालवणारे दोन तृतीयांश ठाकरे शिंदे गटात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकट्याचाच हक्क सांगणे योग्य नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
नागपुरात आले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, बहुमत म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती नाही. इतर ठाकरे कुटुंबीयही शिंदे गटात आहेत. शिवसेना असं नाव तुम्ही ठेवलं आहे, छत्रपतींचे नाव तुम्ही वापरले आहे. मग तर त्यांचे वंशज अध्यक्ष रहायला पाहिजे होते ना. पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. एकटे उद्धव ठाकरेच पक्षावर दावा सांगत आहेत. आधीच त्यांनी नीट पक्ष सांभाळला असता, तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती.
आमच्या नावानेच लोक निवडून येतात, असा गैरसमज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) का करून घेतात? मग फक्त ५६ मतदारसंघांत तुमचे नाव चालते का आणि इतर ठिकाणी तुमचं नाव चालत नाही का, असं काही आहे का, असा सवाल मंत्री मुनगंटीवार यांनी केला. जो कसेल त्याची जमीन, तसेच जो काम करेल, त्याचा पक्ष, असे सांगत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेल्यांचा पक्ष होईल का, असाही सवाल त्यांनी केला.
वाघांसाठी रेस्क्यू सेंटर..
वाघांचे योग्य ठिकाणी स्थानांतरण करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मग तो वाघ जंगलातला असो किंवा राजकारणातला. चाळीस वाघांचे स्थलांतरण तर आम्ही योग्य ठिकाणी केले आहे. उर्वरित जखमी वाघांसाठी आम्ही काही रेस्क्यू सेंटर उभारत आहोत. तिथे त्यांचा योग्य उपचार केला जाईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.