Mungantiwar : सोन्याचं कडं व जिवा महाला पुरस्कार देऊन होणार मुनगंटीवारांचा सन्मान...

या दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जीवा महाला पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारात सत्कार करून सोन्याचे कडे भेट दिले जाते. तो मान यंदा मुनगंटीवार यांना दिला जाणार आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : मार्गशीष शुद्ध सप्तमी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. यावर्षी महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने प्रतापगढावरील अफजलखानाच्या थडग्याभोवती झालेले अतिक्रमण भुईसपाट केले. यामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यासाठी प्रतिष्ठेचा जीवा महाला पुरस्कार मुनगंटीवार यांना दिला जाणार आहे.

या सोहळ्याच्या संयोजन समितीचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी ‘सरकारनामा’ला ही माहिती दिली. यासंदर्भात बोलताना श्री एकबोटे म्हणाले, पुण्यातील सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन शिवप्रताप दिन साजरा करतात. यावर्षी या दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जीवा महाला पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारात सत्कार करून सोन्याचे कडे भेट दिले जाते. तो मान यंदा मुनगंटीवार यांना दिला जाणार आहे. शिवप्रताप दिन म्हणजे मार्गशीष शुद्ध सप्तमी ३० नोव्हेंबरला पुण्यातील (Pune) सरस्वती मंदिर मैदान नातू पार्क येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात यावर्षी पुण्यातील सर्व गणेश मंडळेही सहभागी होणार आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारने अफजलखानाच्या थडग्याच्या परिसरातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर वनमंत्री मुनगंटीवार यांनी गनिमी काव्याने अतिशय सूक्ष्म नियोजन करून कारवाई पार पाडली आणि अतिक्रमण जमीनदोस्त केले. प्रतापगडावर त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव त्याच तोलामोलाच्या व्यक्तिमत्त्वाकडून व्हायला पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. आळंदीचे ज्येष्ठ संत शांतिब्रम्ह मारुती महाराज खुळेकर यांच्या हस्ते मुनगंटीवार यांचा गौरव होणार आहे. मारुती महाराज ९० वर्षांचे आहेत आणि सुधीर मुनगंटीवार येणार असल्यामुळे ते या कार्यक्रमासाठी यायला तयार झाले आहेत, असे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक संयोजन समितीमध्ये आहेत. विश्‍व हिंदू परिषदेचे राज्याचे प्रमुख शंकर गायकर यांचीसुद्धा उपस्थिती राहणार आहे.

मिलिंद एकबोटे यांनी १९९६ साली प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्याची सुरुवात केली. नंतरच्या काळात त्यांना प्रतापगडावर जाण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे तो कार्यक्रम वाई आणि राजगडला करण्यात येत होता. २०१३ पासून हा कार्यक्रम पुण्यात शनिवार वाड्यावर व्हायला लागला. पुण्यातल्या सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात. यावर्षी सरस्वती मंदिराचे मैदान नातू पार्कवर हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी दगडूशेठ हलवाई ट्रस्टसुद्धा सहभागी होणार आहे. ट्रस्टतर्फे सहभागी सर्वांना पेढे वाटप करण्यात येणार आहे.

Sudhir Mungantiwar
Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, या निर्णयामुळे वनकर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल !

प्रतापगडावरील अफझलखानाच्या थडग्याचे अतिक्रमण काढण्यामुळे अवघा महाराष्ट्र आनंदला. अफझलखानाचे उदात्तीकरण आणि शिवरायांचे अवमूल्यन संतापजनक होते. शिंदे-फडवणीस सरकारच्या इच्छाशक्तीमुळे ते अतिक्रमण जमीनदोस्त झाले आणि समस्त शिवप्रेमींसाठी सोनियाचा दिवस उगवला. हे सर्व घडले ते सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजन कौशल्यामुळे. गनिमी काव्याचा वापर करून प्रशासनाने कोणताही अडथळा न येऊ देता हे शिवकार्य पार पाडले. या कार्याच्या नियोजनासाठी मुनगंटीवार आठवडाभर काम करीत होते. त्यामुळेच महाराष्ट्राला सुखद धक्का बसला आणि शिवप्रतापभूमी विदेशद्रोह्यांच्या अतिक्रमणातून मुक्त झाली, असेही मिलिंद एकबोटे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in