मुनगंटीवार कडाडले; वेकोलि अधिकाऱ्यांना म्हणाले, रहिवाशांना त्रास द्याल तर, याद राखा !

पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेल्यांना वेकोलिने त्रास देऊ नये, अशा शब्दांत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी वेकोलिच्या अधिका-यांना खडसावले.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : चंद्रपूर (Chandrapur) शहरातील बाबुपेठ, हिंदुस्थान लालपेठ कॉलनी आणि इतर भागात गत ४० ते ५० वर्षांपासून लोकांचे वास्तव्य आहे. नागरी सुविधांची कामे या क्षेत्रात करण्यात आली आहेत. अतिक्रमण झाले त्यावेळी किंवा जनसुविधेची कामे होत असताना वेकोलिला (WCL) जाग आली नाही. मात्र आता येथील रहिवाशांना नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेल्यांना वेकोलिने त्रास देऊ नये, अशा शब्दांत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी वेकोलिच्या अधिका-यांना खडसावले.

जिल्हा नियोजन सभागृहात वेकोलिच्या नोटीससंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी (Collector) विनय गौडा जी. सी., मनपा आयुक्त (Municipal Commissioner) विपिन पालीवाल, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, ब्रिजभूषण पाझारे, विवेक बोडे आदी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वेकोलिने यापुढे कोणतीही नोटीस द्यायची नाही. ज्यावेळी अतिक्रमण झाले, त्याच वेळेस वेकोलिने आक्षेप का घेतला नाही, असा सवाल त्यांनी केला.

आज त्यांची दुसरी – तिसरी पिढी तेथे राहत असताना तुम्ही नागरिकांना जमिनी खाली करायला लावता. हे अतिशय गंभीर असून असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अतिक्रमित जमिनी पुन्हा डी-नोटीफाईड करणे आणि गुगल मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबवावी. तसेच नागरिकांनी जमिनीचा पट्टा मागण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज सादर करावे. अमृत महोत्सवी वर्षात जनतेच्या जमिनी जनतेला द्या. आजच्या परिस्थितीत नवीन अतिक्रमण होत असेल तर त्यांना रोखा, याबाबत प्रशासन वेकोलिला सहकार्य करेल. मात्र अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्यांचे छत्र हिरावून घेऊ नका.

Sudhir Mungantiwar
Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, या निर्णयामुळे वनकर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल !

निवृत्त झालेले कर्मचारी हक्काचा पैसा मिळाल्यावर घर रिकामे करतील. तसेच ज्या जमिनीवर अतिक्रमण आहे, त्याची मोजणी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. एवढेच नाही खाणीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खाण सुरक्षा अधिका-यांना जिल्हाधिका-यांनी पत्र लिहून वस्तुस्थितीबाबत अवगत करावे. मायनिंग सेफ्टी अधिका-यांसोबत व्ही.एन.आय.टी.द्वारेसुध्दा सर्व्हे होणे गरजेचे आहे. गट क्रमांक ३२९ एसीसी कंपनीला विनापरवानगी कसा दिला, याचा अभ्यास करून जिल्हाधिका-यांनी संपूर्ण कागदपत्रे तपासावीत. नवीन चंद्रपूरच्या आराखड्याबाबत जिल्हाधिका-यांनी बैठक घ्यावी. ओबी बाबतीत रॉयल्टी शून्य करता येईल का, याचे नियोजन करावे. तहसीलदार आणि वेकोलिच्या अधिका-यांनी ब्लास्टिंगबाबत एक प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. बैठकीला बाबुपेठ, लालपेठ व इतर भागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com