Mumbai News: मुंबई आणि शिवसेना, हे नाते आजपर्यंत कुणी तोडू शकले नाही, आणि...

BJP News: भाजपच्या लोकांची स्मरणशक्ती कमी आहे की काय, हे तपासले पाहिजे.
Manisha Kayande, Shivsena
Manisha Kayande, ShivsenaSarkarnama

Shivsena Leader Manish Kayande News : भाजपच्या लोकांची स्मरणशक्ती कमी आहे की काय, हे तपासले पाहिजे. ते २५ वर्ष आमच्यासोबतच सत्तेत होते आणि भ्रष्टाचारासाठी आमच्याकडे अंगुलिनिर्देश करीत आहे, हे चुकीचे आहे. त्या-त्या वेळचे उपमहापौर, नगरसेवक हे प्रत्येक वेळी निर्णय प्रक्रियेत आमच्यासोबत होते. आता भ्रष्टाचार झाल्याचा जो कांगावा ते करीत आहे, त्याला काही अर्थ नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या.

२० ते २२ जानेवारी या कालावधीत भंडारा (Bhandara) येथे १९ वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा आमदार चषक होत आहे. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मनीषा कायंदे (Manisha Kayande) आज येथे आल्या असताना पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, सरकारला कुठल्या चौकश्‍या करायच्या त्या करू द्या. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात मेट्रोचे काम वेगाने सुरू होते, पूर्ण आता झाले. आम्ही केलेल्या कामांचीच रंगरंगोटी करून त्याचे लोकार्पण करण्याचा सपाटा भाजपवाल्यांनी लावला आहे.

सुशोभीकरण केल्याचा आव हे लोक आणत असले तरी उद्धव ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनीच मुंबईत सेल्फी पॉइंट आणि सुशोभीकरणाची कामे सुरू केली होती. समुद्रकिनारी जे डेक तयार झालेले आहेत, ते आमच्या काळातच केलेले आहेत. आता त्यांची सत्ता आहे. त्यामुळे ‘जिसकी लाठी उसकी भैस’, ही उक्ती लागू होणारच आहे.

जनतेमध्ये जाऊन कुणीही विचारावे, मुंबई आणि शिवसेनेचे नाते काय आहे? हे नाते आजपर्यंत कुणी तोडू शकले नाही आणी यापुढेही कुणी तोडू शकणार नाही. आमच्या पक्षाला खिळखिळं करण्याचं काम शिंदे गटाने सुरू केलं आहे. काही लोक आमच्यापासून दूर जात असले तरी नवीन लोक आमच्याकडे येत आहे आणि पक्ष पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होतो आहे.

Manisha Kayande, Shivsena
Video: रिकामंटवळे उद्योग करणं म्हणजे हिंदुत्व नाही - मनीषा कायंदे

जुन्या निष्ठावंतांना जबाबदाऱ्या देण्याचे काम सुरू आहे. शिंदे गट आमच्या लोकांना वेगवेगळी आमिष दाखवून घेऊन जात आहे. पण त्या लोकांच्याही लक्षात सत्यस्थिती यायला वेळ लागणार नाही. बेईमानी करून गेलेले लोक किती दिवस टिकतील, हा प्रश्‍न आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मूळ शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि निष्ठावान शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये चित्र स्पष्ट होणारच आहे, असे मनीषा कायंदे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com