Fadanvis : मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है !

ती कोऑर्डीनेटेड पद्धतीची ॲक्शन आहे. यावर सध्या बोलणे योग्य होणार नाही. पण योग्य वेळ आल्यावर मी या विषयावर अधिकृतपणे बोलेन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Devendra Fadanvis and Uddhav Thackeray
Devendra Fadanvis and Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : एनआयएकडून जी छापेमारी सुरू आहे, यासंदर्भात लवकरच सर्व माहिती आपल्याला मिळेल आणि जी काही छापेमारी सध्या चाललेली आहे, ती कोऑर्डीनेटेड पद्धतीची ॲक्शन आहे. यावर सध्या बोलणे योग्य होणार नाही. पण योग्य वेळ आल्यावर मी या विषयावर अधिकृतपणे बोलेन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या नागपूर (Nagpur) विभागाचा सुवर्ण महोत्सव आणि भारतीय विद्या भवनच्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नागपुरात आले असताना विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते. जर हिंमत असेल तर एका महिन्यात महानगरपालिका (Municipal Corporation) आणि राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले होते. याबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरुदन होतं. आम्ही तर नियमांप्रमाणे निवडून आलो आहोत. मात्र त्यावेळी आमच्या सोबत निवडून येऊन आमच्याच पाठीत खंजीर खुपसला, त्यावेळी त्यांनी राजीनामे का दिले नाही, असा सवाल फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत ते निवडून आले नव्हते, तर आमच्यासोबत निवडून आले होते, नरेंद्र मोदींचे फोटो लावून निवडून आले होते. त्यांच्यात हिंमत होती, तर त्यावेळी राजीनामे द्यायचे असते आणि पुन्हा निवडून येऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करायची असती. त्यामुळे त्यांचं कालचं जे भाषण होतं, ते निराशेचं भाषण होतं. देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे... असंही काही ते बोलले. पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की, ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है’,

Devendra Fadanvis and Uddhav Thackeray
'ग्रामपंचायतीचे निकाल म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारवरचा जनतेचा विश्वास'

त्यांनी तिघांनी मिळून २०१९ साली सुद्धा माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी एकत्रितपणे मला संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण संपवू शकले नाहीत. यापुढेही ते मला संपवू शकणार नाहीत. पाहिजेत तर त्यांनी पुन्हा प्रयत्न करून बघावा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in