खासदार तुमाने म्हणाले, माझ्या घरी काल बैठक झालीच नाही, काल नागपुरात होतो !

माझ्या दिल्लीतील घरी त्यांची काल बैठक झाल्याचे वृत्त देण्यात आले. पण अशी कुठलीही बैठक झाली नाही आणि काल मी नागपुरात होतो, (Nagpur) असे खासदार तुमाने आज येथे म्हणाले.
MP Krupal Tumane
MP Krupal TumaneSarkarnama

नागपूर : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपने आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना मतदान करण्यावरून शिवसेनेच्या खासदारांमध्ये मतप्रवाह आहेत, असे वृत्त सध्या सर्वत्र फिरत आहे. रामटेकचे (Ramtek) खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सेनेच्या खासदारांची बैठक झाल्याचीही माहिती पसरविण्यात आले. त्यावर काल मी नागपुरात होते, असे उत्तर खासदार कृपाल तुमाने यांनी दिले आहे.

द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन दिले पाहिजे, अशी मागणी आमच्या काही लोकांकडून पुढे आली आहे. खासदारांशी चर्चा करून त्यावर निर्णय करू, असे मी कालच सांगितलेले आहे. आमचे खासदार दिल्लीत (Delhi) आहेत आणि माझ्या दिल्लीतील घरी त्यांची काल बैठक झाल्याचे वृत्त देण्यात आले. पण अशी कुठलीही बैठक झाली नाही आणि काल मी नागपुरात (Nagpur) होतो, असे खासदार तुमाने आज येथे म्हणाले.



माझ्या माहितीप्रमाणे आमचे पाच ते सहा खासदार पंढरपूरला (Pandharpur) गेलेले आहेत. मग दिल्लीत पोहोचले कसे, असा प्रश्‍न खासदार तुमाने यांनी उपस्थित केला. सध्या मी नागपुरातच आहे. मंगळवारी पार्लीमेंट्री बोर्डाची बैठक आहे, त्यासाठी मी दिल्लीला जाणार आहे. शिवसेनेचे काही खासदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, आमच्या खासदारांनी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. यापुढेही मांडू आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा तो ते घेतील.

MP Krupal Tumane
...तर बिहारचाही महाराष्ट्र करून दाखवू : खासदार तुमाने



शिवसेनेच्या खासदारांमध्ये कुठलीही चलबिचल नाही. खासदार भावना गवळींना (Bhavana Gawali) प्रतोदपदावरून हटवण्यात आले, त्याचे कारण आमचे पक्षश्रेष्ठीच सांगू शकतात. त्यांच्याबद्दल मी बोलणे योग्य होणार नाही. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांच्याशी मी बोललो. त्या स्वतःच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार आहेत, असे खासदार तुमाने म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com