खासदार तुमानेंना नागपुरात हवी मेट्रो फेज-II, म्हणाले रामटेकचा विकास होणार...

खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांनी मंत्री हरदिप सिंह पुरी (Hardip Singh Puri) यांना मेट्रो विस्तारामुळे होणारा रामटेक क्षेत्राच्या विकासाबाबत माहिती दिली.
MP Krupal Tumane
MP Krupal TumaneSarkarnama

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे सेवेचा (Metro) विस्ताराची घोषणा मागील अर्थसंकल्पात करण्यात आली. नागपूर (Nagpur) मेट्रो फेज-II (फेज-2)च्या विस्ताराने रामटेक लोकसभा क्षेत्राचा विकास गतिमान होणार आहे. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने (Central Minister) या विस्तारित प्रकल्पास अद्याप त्यास मान्यता दिली नसल्याने मेट्रोचा विस्तार रखडला आहे. यामुळे नागपूर मेट्रो फेज-2 ला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी खासदार श्री कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांनी आज केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardip Singh Puri) यांना नवी दिल्ली येथे भेटून केली.

मेट्रोचा विस्तार झाल्यास रामटेक (Ramtek) क्षेत्रात होणाऱ्या विकासावर त्यांनी चर्चा केली आणि तसे पत्रही त्यांना दिले. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे कृपाल तुमाने यांनी मंत्री पुरी यांना मेट्रो विस्तारामुळे होणारा रामटेक क्षेत्राच्या विकासाबाबत माहिती दिली. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोच्या फेज-II साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 5,976 कोटी रुपयांची तरतूद केली होती, असेही मंत्री श्री पुरी यांना सांगितले. खासदार तुमाने म्हणाले, मेट्रोचा फेज-II झाल्याने मेट्रो सेवा नागपूर शहराबाहेर उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेकडे बुटीबोरी, पश्चिमेकडे हिंगणा व पूर्वेकडे कापसी खुर्द व ट्रान्सपोर्ट नगर पर्यंत वाहतुकीची सुविधा होईल.

हा सर्व भाग मोठ्या नागरी वस्तीचा व औद्योगिक असल्याने कामगारांना या सेवेचा मोठा फायदा होईल. या भागात रोजगाराच्या संधी वाढतील व प्रवास करण्याची सुविधा मिळेल. यामुळे मेट्रो विस्तार होणे गरजेचे आहे, असेही श्री तुमाने यांनी सांगितले. यासोबतच मेट्रो फेज- 2 मंजुरीसाठी युनियन कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवून मंजुरी मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही श्री तुमाने यांनी केली. यावर मंत्री श्री पुरी यांनी फेज- 2 प्रकल्प गतिमान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

विकासाला ठरणार पूरक..

सध्याची मेट्रो सेवा केवळ शहरापुरतीच मर्यादित आहे. नागपूरच्या नजीकच्या वस्त्या व गावातून शहरात व शहरातून लगतच्या औद्योगिक भागात जाणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. त्या सर्व लोकांना मेट्रो सेवा विस्ताराचा मोठा फायदा होणार आहे. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली नसल्याने फेज -2 रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी मंत्री महोदय श्री हरदीप सिंग पुरी यांना निवेदन देत चर्चा केली व मंजुरी मिळावी यासाठी पुढाकार घेण्याची आग्रही विनंती केली, असे भेटीनंतर खासदार श्री कृपाल तुमाने यांनी सांगितले.

MP Krupal Tumane
...तर बिहारचाही महाराष्ट्र करून दाखवू : खासदार तुमाने

21.39 लाख लोकांना फायदा..

मेट्रोच्या फेज -2 मध्ये नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा मेट्रो सेवेत समावेश होणार आहे. सध्या सुरू असलेल्या पहिल्या टप्प्याचा विस्तार हा विस्तार असेल. फेज - 2 मध्ये 48.3 किलोमिटर लांबीचा असून 35 स्थानके असतील. ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्येच्या 21.39 लाख लोकांना या सेवेचा फायदा होईल. 11,216 कोटी रुपयांच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या फेज-2 राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 8,680 कोटी रुपयांच्या नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा महामेट्रोद्वारे कार्यान्वित केला जात आहे.

असा आहे फेज-II..

- ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान - 13 किमी., 12 स्टेशन - लेखानगर, कामठी व ड्रॅगन पॅलेस या मुख्य थांब्यांचा समावेश.

- मिहान ते एमआयडीसी बुटीबोरी - 18.5 किमी., 10 स्टेशन - जामठा, डोंगरगाव, मोहगाव, बुटीबोरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलोनी.

- प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्टनगर - 5.6 किमी., 3 स्टेशन, अंबेनगर, कापसी, ट्रान्सपोर्टनगर व असोली.

लोकमान्यनगर ते हिंगणा : 6.7 किमी., 7 स्टेशन, नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, रायपूर, हिंगणा.

वासुदेवनगर ते दत्तवाडी : 4.5 किमी., 3 स्टेशन, रायसोनी कॉलेज, एमआयडीसी, आॅर्डनन्स फॅक्टरी कॉलनी व वाडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com