चंद्रपूरमध्ये जाऊन अम्माच्या प्रेमात पडल्या खासदार सुप्रिया सुळे !

आज चंद्रपूर (Chandrapur) दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा म्हणजेच गंगुबाई जोरगेवार यांची भेट घेतली.
चंद्रपूरमध्ये जाऊन अम्माच्या प्रेमात पडल्या खासदार सुप्रिया सुळे !
MP Supriya Sule with MLA Kishor Jorgewar and Amma.Sarkarnama

चंद्रपूर : कर्तृत्ववान महिला आणि तिचा वसा समोर नेणारा कार्यक्षम मुलगा हे नातं खूप महत्वाचं आहे. अम्माने शून्यातून विश्व निर्माण केलं. तेच विचार आणि संस्कार घेऊन किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेला अम्माचा टिफिन हा उपक्रम अप्रतिम आहे. अम्माच्या भेटीला आलेली मी आज त्यांचे हे काम पाहून त्यांच्या प्रेमात पडली, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अम्माचे आणि पर्यायाने अम्माचा टिफिन या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

आज सोमवारी चंद्रपूर (Chandrapur) दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांच्या मातोश्री अम्मा म्हणजेच गंगुबाई जोरगेवार यांची त्यांच्या राजमाता या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा शामकुळे, राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ग्रामीण चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन भटाळकर, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, अजय जयस्वाल आदींची उपस्थिती होती.

कोणीही गरजू उपाशी झोपता कामा नये. या अम्माच्या शब्दांना पूर्ण करण्याच्या हेतूने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात अम्माचा टिफिन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अत्यंत गरजूंना दररोज जेवणाचा डबा घरपोच पोहचविला जात आहे. दरम्यान आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहोचत अम्माची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अम्माचा टिफीन या उपक्रमाची माहिती जाणून घेत कौतुक केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अम्माच्या प्रकृतीचीही विचारपूस केली.

MP Supriya Sule with MLA Kishor Jorgewar and Amma.
Osmanabad : सलगर कुंटुंबाकडून सुप्रिया सुळे यांचे औक्षण अन् घोंगडी भेट देऊन स्वागत..

अम्माने कष्टाने शून्यातून उभारलेले हे विश्व मोठे आहे. ते पूर्ण ताकदीने समोर नेण्याचे काम त्यांचा मुलगा आमदार किशोर जोरगेवार करत आहेत. राजकारणापलीकडेही नाते असतात, ते जोपासण्याची गरज असून आजची ही भेट राजकीय नसून मनापासून नाते जोपासण्यासाठीची आहे. आज मी अम्मा आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या परिवाराच्या भेटीला आली असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी येण्याचे निमंत्रणही अम्माला दिले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संपूर्ण परिवारासह यंग चांदा ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in