Navneet Rana News: न्यायालयाचा राणांना दुहेरी दणका; दंडही ठोठावला अन् वडिलांबाबत मोठा निर्णय

Caste Certificate : वडील हरभजन सिंह कौर हे कोर्टापुढे हजर न झाल्यास...
Navneet Rana
Navneet Rana Sarkarnama

Navneet Rana Cast Certificate Issue : जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंह कौर यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राणा आणि त्यांचे वडील हरभजन सिंह कौर यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एक हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

तसेच नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर हे कोर्टापुढे हजर न झाल्यास त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोर्टाने एक महिन्याची मुदत दिली असून या कालावधीत ते हजर न झाल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला पार पडणार आहे.

Navneet Rana
Bihar Politics: 'मरण आले तरी चालेल पण, मी भाजपमध्ये..'; नितीश कुमार यांचे मोठं विधान

तसेच नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली प्रकरणं दोन्ही वेगवेगळी असल्याचे निरीक्षण शिवडी कोर्टाने यावेळी नोंदवले आहे.

नवनीत राणा या लोकसभेला ज्या मतदारसंघामधून निवडून आल्या आहेत. तो मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता. मात्र, राणांनी आपण अनुसूचित जातीतच असल्याचा दावा करत ही निवडणूक लढवली. पण त्यांनी दाखल केलेले जातीचे प्रमाणपत्र व शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये फेरफार करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

Navneet Rana
Shivsena News : बदलीसाठी पैसे घेतले, खैरेंच्या मुलाची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल..

यानंतर राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंह कौर यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर राणांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत या प्रकरणामधून दोषमुक्त करण्याच्या विनंतीची याचिका दाखल केली होती. पण ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली होती.

दरम्यान, नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर हे पुढच्या सुनावणीपर्यंत न्यायालयासमोर हजर होणार की नाही? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com