
Kripal Tumane was elected in 2014 : शिवसेनेचे नेते खासदार कृपाल तुमाने २०१४मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. तेव्हा मोदी लाटेचा त्यांना चांगलाच फायदा झाला. त्यानंतर २०१९मध्येही याच लाटेवर स्वार होत ते पुन्हा खासदार झाले. पण आता उद्धव ठाकरे गटाने त्यांना पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. (The Uddhav Thackeray group has taken up the task of defeating him)
तुमाने दोन वेळा निवडून आले. दोन्ही वेळा भाजप आणि शिवसेनेची (उद्धव ठाकरे) युती होती. या युतीचा आणि मोदी लाटेचा त्यांना फायदा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड केले आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेत भाजपसोबत हातमिळवणी करून राज्यात सरकार स्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले. त्या घडामोडीमध्ये खासदार तुमानेही शिंदेंसोबत गेले.
गुवाहाटीला जाऊन खासदार तुमाने यांनी चतुर खेळी केली. कारण रामटेकचा गड सर करायचा असल्यास भाजपची साथ घेणे गरजेचे आहे, ते ते जाणून होते. इकडे उद्धव ठाकरे एकाकी पडले. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाऊन भाजपची साथ कायम ठेवली. आता तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही कार्यक्रमांमध्ये दिसू लागले आहेत. खासदारकीची हॅट्रीक त्यांना खुणावू लागली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक रामटेकमधून तुमानेंना घरी पाठवण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.
मुकुल वासनिक पराभूत झाल्यानंतर काँग्रेसनेही या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. तुमाने गेले असले तरी सहजासहजी ही जागा उद्धव ठाकरे यांची सेना सोडणार नाही आणि सोडली तरी तुमानेंच्या पराभवासाठीच ठाकरेंचे सैनिक काम करतील, असे सध्याचे चित्र आहे. महाप्रबोधन यात्रेदरम्यान सुषमा अंधारे यांनी रामटेकमध्ये घेतलेल्या सभेत गद्दारांना धडा शिकवण्याचा विडा ठाकरे सैनिकांनी उचलला आहे. तुमानेंना पुन्हा रामटेकच्या गडावर चढू देणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी दिला आहे. त्यामुळे यावेळी रामटेक जिंकणे तुमानेंसाठी वाटते तेवढे सोपे नाही.
माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत (Nitin Raut) यांनी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यांनी आपणास उमेदवारी दिल्याचे २०१९च्या निवडणुकीच्या (Election) वेळी जाहीर केले होते. माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारीसुद्धा दाखल केली होती. नंतर ती मागे घेतली. कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याने तुमाने यांचे तेव्हा चांगलेच फावले होते. कॉंग्रेसच्या गटबाजीनेही अप्रत्यक्षपणे तुमानेंना मदतच केली होती. पण २०२४ची लढाई त्यांच्यासाठी अवघड ठरणार आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.