खासदार जाधवांनी विठ्ठलाच्या मंदिरात येऊन ‘हाच’ आरोप पुन्हा करावा, सावजींचे आव्हान !

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांतच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार प्रतापराव जाधव यांनी माजी मंत्री सुबोध सावजी यांचे चिरंजीव शैलेश सावजी यांच्यावर सरपंच पदाच्या निवडणुकीत पैसे घेतल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
खासदार जाधवांनी विठ्ठलाच्या मंदिरात येऊन ‘हाच’ आरोप पुन्हा करावा, सावजींचे आव्हान !
MP Prataprao JadhavSarkarnama

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीवरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांतच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार प्रतापराव जाधव यांनी डोणगाव निवासी व माजी मंत्री सुबोध सावजी यांचे चिरंजीव शैलेश सावजी यांच्यावर सरपंच पदाच्या निवडणुकीत पैसे घेतल्याचा घणाघाती आरोप केला आहे. र

खासदार जाधवांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत शैलेश सावजी यांनी प्रतापराव जाधवांना आव्हान देत आज एकादशीच्या दिवशी खासदार जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठलासमोर पुन्हा हे आरोप करण्याच आव्हान दिले आहे. यावरून आता आगामी काळात यावरून महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) स्थिती काय असणार, याकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागलेले आहे.

याबाबत खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, डोणगाव सरपंचपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात जे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, डोणगाव ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. यापूर्वीच्या काळातही तेथे शिवसेना विरुद्ध सुबोध सावजी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत होत आली आहे. मागच्या काळात सुबोध सावजी यांचे ९ सदस्य निवडून आले होते आणि शिवसेनेचे १७ पैकी ८ सदस्य निवडून आले होते. पण सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला ९ मते पडली आणि त्यांच्या सरपंचपदाच्या उमेदवाराला ९ मते पडली होती. तेव्हाही सुबोध सावजी यांनी आगपाखड केली होती.

सरपंचपदाच्या निवडणुकीत १ मत कमी झालं म्हणून सुबोध सावजींनी त्यांच्या सदस्यांमधून जे हिंदू होते, त्यांना हनुमानाचा शेंदूर काढायला लावला आणि जे मुस्लीम होते, त्यांना कुराणाची शपथ दिली. बौद्ध सदस्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ घ्यायला लावली. काही लोकांना त्यांनी तांदूळ चारले, जेणेकरून जे फुटले असतील, त्यांना त्रास झाला पाहिजे. या निवडणुकीत आखाडे गटाचे ५ आणि सुबोध सावजी गटाचे ९ सदस्य त्यांच्याकडे होते. शिवसेनेकडे ८ सदस्य होते. पण याही वेळी त्यांच्या उमेदवाराला ८ मते मिळाली आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवाराला ९ मते मिळाली. याही वेळी त्यांचे एक मत फुटले, पण त्यांनी कुठलीही खातरजमा केली नाही, असेही खासदार जाधव म्हणाले.

MP Prataprao Jadhav
‘शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी कामाला लागावे’

यावेळी सुबोध सावजी, शैलेश सावजी यांनी कुणाला शेंदूर काढायला लावला नाही की, कुणाला कुराणाची आणि डॉ. आंबेडकरांची शपथ घ्यायला लावली नाही. सावजी आणि आखाडे यांचे राजकीय वैर सर्वांना माहिती आहे. हे वैर पिढ्यान्पिढ्या चालत आलेले आहे. सावजींना आखाडेंचा सरपंच होऊ द्यायचा नव्हता, म्हणून यांनीच शिवसेना पुरस्कृत उमेदवाराला मदत केली. पण उपसरपंचपदाच्या निवडणुकीत मात्र सावजींचा उमेदवार ९ मते घेऊन विजयी झाला. त्यामुळे सावजींना आखाडे गटाचा सरपंच होऊ द्यायचा नव्हता, म्हणून त्यांनी ती चर्चा केली आणि कुणीतरी तो व्हिडिओ व्हायरल केल्याचेही खासदार जाधव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.