खासदार धानोरकर म्हणाले, ‘त्या’ कंपनीवर गुन्हा दाखल करा...

कर्मचाऱ्यांसाठी एक सामूहिक स्वयंपाकगृह स्थापन करा १८० कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, असे खासदार धानोरकर MP Balu Dhanorkar यांनी सांगितले.
खासदार धानोरकर म्हणाले, ‘त्या’ कंपनीवर गुन्हा दाखल करा...
MP Balu Dhanorkar at HospitalSarkarnama

चंद्रपूर : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे निर्माणाधीन इमारत परिसरात कामगारांच्या राहण्याकरिता निवास आहेत. दोन दिवसांपूर्वी घरगुती सिलिंडर लीक झाल्याने स्फोट झाला. यात १० च्या पेक्षा जास्त सिलिंडरचा स्फोट होऊन ४ कोटींच्यावर साहित्यांचे नुकसान झाले. ही घटना अतिशय गंभीर असून यात बेजबाबदारपणा दिसत आहे, असे सांगत कंपनीवर गुन्हा दाखल करा आणि कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

या घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार स्वयंपाक करतेवेळी सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये मालमत्तेची मोठे नुकसान झाले आहे. बेजबाबदारपणाचा हा नमुना आहे. आता कर्मचाऱ्यांसाठी एक सामूहिक स्वयंपाकगृह स्थापन करा १८० कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, असे खासदार धानोरकर यांनी सांगितले. त्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अधिष्ठाता अशोक नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, राजेंद्र सुरपाम, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. भास्कर सोनारकर, उमेश आडे, डॉ. निवृत्ती जीवने, संजय राठोड, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रय, आश्विनी खोब्रागडे, सोहेल रजा, प्रशांत भारती, उमाकांत धांडे, गोपाल अमृतकर, राज यादव, कुणाल चहारे, मतीन शेख उपस्थित होते.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मोठ्या प्रमाणात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथे जवळपास ८०० कामगार काम करीत आहे. येथील कामगार राहत असलेल्या एक इमारतीला आग लागली. त्यात कामगारांच्या जीवनावश्यक वस्तू जाळून खाक झाल्या आहेत. त्यात कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या इमारतीमध्ये जाण्यायेण्यासाठी फक्त दोन शिडी आहेत. त्या वाढवून चार करावा. जेणेकरून कामगारांना काम करताना सोयीचे होईल.

MP Balu Dhanorkar at Hospital
देश चालवता येत नसेल, तर मोदी सरकारने चालते व्हावे : खासदार बाळू धानोरकर

महत्वाची बाब म्हणजे येथे काम करीत असलेले कामगार हे परराज्यातील आहेत. यांच्याकडे घरगुती वापराचे व व्यावसायिक वापराचे सिलिंडर एवढ्या मोठ्या प्रमाणात आले कुठून, याची देखील चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी केली आहे. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी कामगारांशी संवाद साधला. त्यावेळी कामगारांनी विविध समस्या सांगितल्या. त्या लवकर मार्गी लावण्याच्या सूचना कंपनी व्यवस्थापनाला त्यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.