खासदार धानोरकरांनी विदर्भातील उद्योगांसाठी अखेर कोळसा आणलाच...

खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा करून, ही समस्या निकाली काढला आहे.
खासदार धानोरकरांनी विदर्भातील उद्योगांसाठी अखेर कोळसा आणलाच...
MP Balu DhanorkarSarkarnama

नागपूर : आधी दोन वर्ष कोरोनाचे संकट आणि त्यानंतर कोळशाचे आकाशाला भिडलेले भाव, यांमुळे विदर्भातील उद्योग डबघाईस आले होते. या उद्योगांतील लोकांनी मग चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्यानंतर खासदार धानोरकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून विदर्भातील उद्योगांसाठी कोळसा मिळवलाच.

महाराष्ट्रातील (Maharashtra) विशेषतः विदर्भातील (Vidarbha) उद्योगांना भासणारी कोळशाची निकड लक्षात घेता खासदार बाळू धानोरकर यांनी वेकोलि (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) (WCL) व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र राज्य खान महामंडळ नागपूर साठी लघू व मध्यम श्रेणीच्या उद्योगांकरिता कोल इंडियाच्या माध्यमातून वेकोलि तर्फे ४,९०,००० टन कोळसा नुकताच मंजूर झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नोडल एजन्सी मार्फत (MSME) लघु व मध्यम श्रेणी उद्योगांना कोळशाचे वाटप होण्याकरिता चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र क्र. २२.१२.२०२१ आणि २२.०५.२०२२ याद्वारे आग्रह केला होता.

महाराष्ट्र विशेषतः विदर्भात सध्याचे सर्वाधिक उद्योग इंधनासाठी कोळशाचाच वापर करतात. उद्योगांच्या उत्पादनात कोळशाचा घटक हा मुख्य आहे. बाजारात कोळशाच्या किमती अतोनात वाढलेल्या आहे व कोरोना काळात होरपळलेल्या उद्योगांना महाग कोळसा परवडणार नाही, हे लक्षात घेऊन खासदार धानोरकर यांनी वेकोलि व आणि मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून लघु व मध्यम श्रेणी उद्योगांसाठी महाराष्ट्र शासनाकडून (MSMC) महाराष्ट्र राज्य खान महामंडळामार्फत अधिसूचित दरावर कोळसा वाटप मंजूर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील उद्योगांना MSMC च्या माध्यमातून योग्य दरात कोळसा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

MP Balu Dhanorkar
कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले, अखेर हुकूमशहा झुकले...

विदर्भातील उद्योग जर वाचवायचे असतील तर त्यांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. तेव्हा कुठे आपण प्रगती करू शकू आणि विदर्भात सर्व साधनसामग्री विपुल प्रमाणात उपलब्ध करून दिली, तरच नवनवे उद्योग येथे येतील. त्यासाठी आपण सतत प्रयत्न करीत आहोत. वास्तविक पाहता योग्य दरात कोळसा उद्योगांना मिळाला पाहिजे, तो त्यांचा हक्कच आहे. केवळ दुर्लक्षामुळे ही समस्या निर्माण झाली होती. थोड्याशा प्रयत्नांनी आता उद्योगांना योग्य दरात कोळसा मिळणार आहे. यापुढेही विदर्भातील उद्योजकांच्या मदतीसाठी तत्पर राहू, असे खासदार धानोरकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in