ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर भावना गवळी चौकशीसाठी आज उपस्थित राहणार ?

सईद खान यांच्याशी संबंधीत पावणे चार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने( ईडी) टाच आणली. खान हे खासदार भावना गवळी (mp Bhavana Gawli) यांचे निकटवर्तीय मानले जातात.
ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर भावना गवळी चौकशीसाठी आज उपस्थित राहणार ?
Bhavana Gawalisarkarnama

वाशिम : वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार असलेल्या भावना गवळी (mp Bhavana Gawli) यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. भावना गवळी यांना ईडीनं तीन वेळा समन्स बजावलं आहे. भावना गवळी शुक्रवारी ईडी (ED) कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याची शक्यता वर्कवली जात आहे.

भावना गवळी यांना सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, याआधी ईडीने तीन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्या ईडीसमोर हजर झाल्या नाहीत. तर कालच सईद खान यांच्याशी संबंधीत पावणे चार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने( ईडी) टाच आणली. खान हे खासदार भावना गवळी (mp Bhavana Gawli) यांचे निकटवर्तीय मानले जातात.

गवळी यांना चिकुनगुनिया झाला असल्याने त्या याआधीच्या समन्सला अनुपस्थित होत्या. गवळी यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा 'ईडी'ला संशय आहे. याअंतर्गत 'ईडी'ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे गवळी यांना याआधी समन्स बजावले आहेत. गवळी चौकशीला अनुपस्थित राहिल्या होत्या.

 Bhavana Gawali
आमदार शिंदेच्या आरोपाबाबत जयंत पाटलांची सावध भूमिका

प्रकरणात ईडीनं गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले आहेत. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीनं अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गवळी यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. तेव्हापासून ईडीच्या कारवाईला वेग आला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in