‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ म्हणणाऱ्या मोदींच्या लोकांची घोटाळेबाजांसोबत हातमिळवणी !

भाजपचे निष्कासीत माजी आमदार चरण वाघमारे यांनी महाराष्ट्र पक्ष नेतृत्वाची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली आहे.
‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ म्हणणाऱ्या मोदींच्या लोकांची घोटाळेबाजांसोबत हातमिळवणी !
Narendra ModiSarkarnama

भंडारा : नरेंद्र मोदी २०१४ मध्ये जेव्हा सत्तेत आले, तेव्हा ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’, म्हणत त्यांनी तमाम देशवासीयांची मने जिंकली. त्यानंतर मोदींचा हा नारा कितपत खरा ठरला, यावर आजही चर्चा झडतात. पण भ्रष्टाचाऱ्यांसोबत हातमिळवणी जिल्ह्यातील भाजपची मंडळी मोदींच्या त्या नाऱ्याला तिलांजली देत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्याच माजी आमदाराने करून खळबळ उडवून दिली आहे.

भाजपचे निष्कासीत माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांनी महाराष्ट्र पक्ष नेतृत्वाची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली आहे. भंडारा जिल्हा भाजप आणि महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "न खाऊँगा न खाने दुंगा" या आवाहनाला तडा दिला असून भंडारा (Bhandara) जिल्हा भाजपने (BJP) स्वतः खाणाऱ्या आणि घोटाळेबाज लोकांसोबत आता युती केल्याच्या गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

भंडाऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, मी स्वतः भाजपकडून आमदार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना जिल्ह्यात ३ लाख १९ हजार क्विंटल धानाची बोगस बिले काढल्याचा घोटाळा उघड केला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी एसआयटी लावली होती. पुढे ही चौकशी सीआयडीकडे देण्यात आली. मोदींनी आम्हाला जे आवाहन केले, त्याला पुढे जात मी हे घोटाळे बाहेर काढले होते.

आता यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे या घोटाळ्यात सहभागी असताना भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करते. हे म्हणजे मोदी यांच्या आवाहनाला तडा देणे होय. म्हणून सत्तेसाठी भाजप खाणाऱ्या लोकांसोबत गेल्याने आता पंतप्रधान मोदी यांनी स्वतः महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडे लक्ष देण्याची मागणी भाजपचे निष्कासीत माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.

Narendra Modi
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

भंडारा जिल्हा भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुसफुस सुरू आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना विरोध करीत चरण वाघमारे भाजपमधून बाहेर पडले. त्याचे पडसाद भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर उमटले. परवा परवा भाजपचेच दुसरे एक माजी आमदार बाळा काशीवार यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपमध्ये सर्वकाही ‘ऑलवेल’ नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यातच आज चरण वाघमारे यांनी गंभीर आरोप केल्यामुळे येत्या काळात वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in