मोदी, शहांचं ठीक आहे, पण राजनाथ सिंह यांना ‘हे’ शोभत नाही…

वि.दा. सावरकर Vinayak Damodhar Sawarkar यांनी महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती.
मोदी, शहांचं ठीक आहे, पण राजनाथ सिंह यांना ‘हे’ शोभत नाही…
Narendra Modi, Amit Shaha, Nana Patole and Rajnath Singh Sarkarnama

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काहीही बडबड केली तरी चालते. कुणाचा इतिहास कसाही बदलवून सांगितला तरीही चालतो. कारण देशाने त्यांना सोडलं आहे... पण राजनाथ सिंह हे वरिष्ठ नेते आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ते अनुयायी आहेत. इतिहास त्यांना जास्त माहिती असेल. पण त्यांचे महात्मा गांधींबद्दलचे ते वक्तव्य योग्य नाही, त्यांना हे शोभत नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज व्यक्त केली.

वि.दा. सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती, असं वादग्रस्त विधान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टिका करण्यात आली आज नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. चीन आपल्या देशात आक्रमण करण्याच्या स्थितीत आहे. राजनाथ सिंह हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत. सावरकर यांनी १९११ मध्ये पहिल्यांदा माफी मागितली होती. त्या काळात सावरकरांना इंग्रजांकडून ६० रुपये पेंशन मिळायचे. तसा रेकॉर्डही उपलब्ध आहे. त्याकाळात महात्मा गांधी आफ्रिकेत स्वातंत्र्य लढाईत होते. महात्मा गांधी १९१५ मध्ये भारतात आले, असे नाना पटोले म्हणाले.

मोदी नेहमी सांगतात, ते कार्यकर्ते होते तेव्हा मोबाईल होता, ते इमेल पाठवायचे. महात्मा गांधींच्या काळात तसा मोबाईल असेल आणि सावरकरांनी त्या मोबाईलवरून महात्मा गांधींसोबत संपर्क साधला असेल, तर त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे नाही. तो मोदींनी द्यावा, असा खोचक टोलादेखील नाना पटोले यांनी लगावला आहे. देशासाठी महत्वाच्या नसलेल्या विषयावर असं वक्तव्य करून मूळ मुद्द्य़ावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न राजनाथ सिंह यांनी केला आहे.

Narendra Modi, Amit Shaha, Nana Patole and Rajnath Singh
नाना पटोले खरेच मुख्यमंत्र्यांनी बोलणार नाहीत?

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते राज्य सरकारने केलेल्या कामांवर आक्षेप घेत आहेत. कारण येवढाच जॉब त्यांच्याकडे उरला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जो निधी केंद्र सरकारने देणे अपेक्षित आहे, त्यामध्ये राज्यातील भाजपच्या नेत्यांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे. त्यांनी मदत मिळवून दिली, तर त्यांचे कौतुकच केले जाईल. राज्य सरकारने दिलेला निधी तोकडा आहे, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. राज्य सरकारचे आर्थिक स्रोत वाढल्यानंतर आम्ही सरकारला पुन्हा विनंती करणार आहोत की, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान जे झाले आहे, त्यामध्ये आणखी मदत त्यांना मिळाली पाहिजे, ही कॉंग्रेसची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.