मोदींनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणून राष्ट्रवादीतील काहींच्या पोटात दुखतंय…

मोदींनी आधी अजितदादांना बोलण्याची सूचना केली, हे कुणी पाहिले नाही का, असा सवाल आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
मोदींनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणून राष्ट्रवादीतील काहींच्या पोटात दुखतंय…
Ajit Pawar and Devendra Fadanvis Welcome PM Narendra Modi.Sarkarnama

नागपूर : काल पुणे येथील विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवून मोदींनी आस्थेने त्यांची विचारपूस केली. नेमकी हीच बाब राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील काहींच्या पोटदुखीचे कारण ठरली. त्यामुळे राज्यभर नारे, निदर्शने करण्यात आली, असे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.

राजकारणाच्या पलीकडे वैयक्तिक संबंधही असतात, त्यावर शंका घेणे योग्य नसते. पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना बोलू दिले नसल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) काही नेते थयथयाट करीत आहेत. वास्तविक या कार्यक्रमात अजित पवार यांचा कुठलाही अपमान झाला नाही. उलट या कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या व्यक्तीने भाषणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करताच आश्चर्यचकित झालेल्या पंतप्रधानांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांना भाषण करण्याची विनंती केली. त्यावेळी मोदींनी आधी अजितदादांना बोलण्याची सूचना केली, हे कुणी पाहिले नाही का, असा सवाल आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

आयोजकांकडे सुद्धा त्यांनी आश्चर्याने बघितले. मोदींनी आपण भाषण करावे, अशी सूचना अजितदादांना केल्यानंतर अजितदादांनी विनम्रतेने नकार देत आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला आणि मोदींना भाषणाची विनंती केली. हे दृश्य संपूर्ण देशातील जनता बघत होती. यातून नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्या स्वभावातील मोठेपणा सर्वांनी अनुभवला. या प्रसंगातून आपला अपमान झाला, अशी भावना आपल्या स्पष्ट आणि परखड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या अजितदादांच्या मनात निर्माण देखील झाली नसेल. परंतु राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजितदादा यांचा अपमान झाल्याचा थयथयाट सुरू केला. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा जावईशोधदेखील लगेच लावण्यात आला. मोदी आणि भाजपचा निषेध करण्याच्या सूचना लागलीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आणि नारे, निदर्शने सुरू झाली.

Ajit Pawar and Devendra Fadanvis Welcome PM Narendra Modi.
Video: NMRDA चा भ्रष्टाचार बाहेर काढणार !; चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील खरे दुखणे वेगळेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. तेव्हा मोदींनी अजितदादांच्या खांद्यावर आपुलकीने हात ठेवला. देहू येथील कार्यक्रमात सुद्धा या दोघांमधील जिव्हाळा दिसला. नेमकी हीच गोष्ट राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या पोटदुखीचे निमित्त ठरली आणि मग त्यातूनच अजितदादांना अडचणीत आणण्यासाठी हा कथित अपमानाचा बागुलबुवा जन्मास घातला.

अजितदादा आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांमधील मतभेद पक्षात सर्वानाच माहीत आहेत. परंतु कालपासून जे काही सुरू केले, ते त्यांच्या आजपर्यंतच्या घाणेरड्या राजकारणाचा कडेलोट होता. नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांच्यातील आपुलकी बघून काही नेते भयभीत झाले आणि त्यांची पोटदुखी सुरू झाली. कालच्या घटनेचे हे सत्य आहे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in