मनसेचा विदर्भातील शिवसेनेच्या मतदारांवर डोळा, राज ठाकरे नागपुरात येणार !

शिवसेनेला फोडल्यानंतर त्यांचा मतदार सहजासहजी भाजपला मते देणार नाही. त्याला पर्याय म्हणून राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सेना उभी केली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण जुळवली जात आहेत. शिवसेनेचा मूळ मतदार भाजपला मते देणार नाही, असे समजले जात आहे. त्यामुळे ही मते मनसे आपल्याकडे वळवणार असल्याचीही चर्चा आहे. मुंबई, पुणे, नाशिकनंतर राज ठाकरे यांनी आपले लक्ष आता विदर्भाकडे केंद्रित केले आहे. ही नव्या युतीची नांदी असल्याचेही राजकीय जाणकार सांगतात.

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) मुंबई-पुण्यासह नागपूर तसेच विदर्भात (Vidarbha) शिवसेनेला पर्याय उभा करण्यासाठी मोठा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) १३ सप्टेंबरला नागपूर येथे असल्याची माहिती आहे. शिवसेनेला (Shivsena) फोडल्यानंतर त्यांचा मतदार सहजासहजी भाजपला मते देणार नाही. त्याला पर्याय म्हणून राज ठाकरे यांची सेना उभी केली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेचा बऱ्यापैकी दबदबा आहे. नाशिक महापालिकेत मनसेची सत्तासुद्धा होती. मात्र विदर्भाकडे सुरुवातीपासूनच मनसेचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले. पक्षही रसातळाला गेला.

विदर्भात शिवसेनेची व्होट बँक असल्याने ती आपल्याकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकरिता वर्षानुवर्षांपासून चिकटून असलेल्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची गच्छंती केली जाणार असून काही आक्रमक तसेच ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे. नाराज होऊन बाहेर पडलेल्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांनाही पुन्हा बोलावले जात असून याकरिता एक चमू कामाला लावण्यात आली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray : राणे, भुजबळांच्या बंडाशी माझी तुलना नको... राज ठाकरे

अविनाश जाधवांवर जबाबदारी..

राज ठाकरे यांचे विश्वासू अविनाश जाधव यांच्यावर विदर्भातील मनसेला सक्रिय करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ते काही आपल्या सहकाऱ्यांना घेऊन १० सप्टेंबरला नागपूरमध्ये येत आहेत. या दौऱ्यात ते काही खास लोकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. विदर्भातील राजकीय परिस्थिती, संघटना, कार्यकर्त्यांचा अहवाल तयार करून ते पक्षाकडे सादर करतील. त्यानंतर राज ठाकरे यांचा १३ सप्टेंबरचा दौरा निश्चित केला जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in