Yavatmal MNS News : शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मनसेची ‘आर-पार’ची लढाई...

Yavatmal जिल्ह्यात प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
Raju Umbarkar, Wani
Raju Umbarkar, WaniSarkarnama

Maharashtra Navnirman Sena News : २०२२ ते आजपर्यंत १५००च्या वर शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या आहेत. या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना तोंड दिले, पण सरकारने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारसोबत आर-पारची लढाई लढण्याचा निर्धार मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केला.

शेतकऱ्यांच्या (Farmers) मागण्यांसाठी मनसे उद्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी (Wani) येथे ‘आर-पार’चा मोर्चा काढला जाणार आहे. शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर मनसे (MNS) आक्रमक झालेली आहे. पीकविमा, शेतीला दिवसा वीज पुरवठा आदी मागण्यांकडे या मोर्चातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. वरिष्ठ पातळीवर शिंदे-फडणवीस सरकारसोबत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची जवळीक वाढत असताना यवतमाळ जिल्ह्यात प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

गेल्या वर्षभरात विदर्भात दीड हजारच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ओला दुष्काळ असूनही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जुळत नाहीत. ही एक नवी समस्या सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या जिल्ह्यात उद्भवली आहे. ओल्या दुष्काळात खरीप हंगाम गेला, आता दिवसा वीज मिळत नसल्याने रब्बी हंगामही संकटात आहे. अशा स्थितीत सरकारने ठोस पावलं उचलली नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा वाढेल, अशी भिती उंबरकर यांनी व्यक्त केली.

Raju Umbarkar, Wani
आता भाजप सरकारविरूद्ध 'आरपार'ची लढाई : रविकांत तुपकर

विदर्भात हजारो शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती सर्वाधिक भीषण आहे. त्यामुळेच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उद्या वणी येथे ‘आर पार’ मोर्चा काढत असल्याचे उंबरकर यांनी सांगितले. या मोर्चात हजारो शेतकरी, बेरोजगार, विद्यार्थी वणीत रस्त्यावर उतरणार आहेत. सरकारला आमच्या मोर्चाची दखल घ्यावी लागेल आणि शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. असे नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विदर्भभर खळ खट्याक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in