MNS : राज ठाकरेंनी सांगितलेला ‘वरवंटा’ फिरलाच नाही, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे !

Nagpur : वरिष्ठ पदाधिकारी चुकीची वागणूक देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

MNS Chief Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नागपुरात कार्यकर्ते मिळत नाहीत, असे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर राज ठाकरे नागपुरात आले होते. तेव्हा त्यांनी त्या वृत्ताबाबत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशनादरम्यान ते नागपुरात आले होते. तेव्हा त्यांनी ३००च्या वर पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र दिले होते.

राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र स्वीकारणाऱ्या उत्तर नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी अवघ्या दोन महिन्यांत राजीनामे देणे सुरू केले आहेत. वरिष्ठ पदाधिकारी चुकीची वागणूक देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र वरिष्ठ पदाधिकारी कोण आणि काय त्रास देतात, याची माहिती कोणी दिली नाही.

राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये येऊन शहराची कार्यकारिणी बरखास्त केली होती. नव्या दमाच्या लोकांना संधी द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनादरम्यान ते नागपूरला आले होते. वसंतराव देशपांडे सभागृहात भव्य नियुक्तिपत्र वाटपाचा कार्यक्रम मनसेच्यावतीने घेण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या हस्ते सुमारे साडेतीनशे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले होते.

मनसेला (MNS) नागपुरात कार्यकर्ते मिळत नाहीत’, हे खोटे ठरवण्यासाठी आपण खास नागपूरला एकाच दिवशी सुमारे तीनशे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी तेव्हा सांगितले होते. यावेळी आपल्या भाषणात ‘मनसेचे पोट्‍टे प्रस्थापितांच्या डोक्यावर वरवंटा फिरवतील’, असा दावा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. मात्र अवघ्या दोन महिन्यांतच सर्व पोट्‍ट्‍यांनी पक्षातून पळायला सुरुवात केली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray : धंगेकरांचा प्रचार मनसैनिकांना भोवला; 'या' सात जणांची पक्षातून हकालपट्टी

उत्तर नागपूर (Nagpur) विभागाचे अध्यक्ष महेश माने यांनी सहकाऱ्यांसोबत पटत नसल्याचे सांगून आधीच राजीनामा दिला आहे. त्यांनी वरिष्ठांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली होती. त्यानंतर उत्तर नागपूर कार्यालयीन प्रमुख रामभाऊ हेडाऊ, सहसचिव प्रवीण बावणे, प्रभाग क्रमांक दोनमधील शाखा अध्यक्ष प्रकाश बोंद्रे, कांतेश्वर नगराळे, कुंजीलाल सहारे, किशोर भोयर, प्रभाग क्रमांक एकमधील मुकेश चतुर्वेदी, प्रभाग चारमधील अमिन खान यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in