मनसे हा राज्यव्यापी पक्ष नाही, मग त्यांच्या मागे एवढं बळ आले कोठून ?

कोणत्यातरी पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, असे वाटते. त्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी करून अप्रत्यक्षपणे भाजपला भोंग्याच्या प्रकरणात टारगेट केले आहे.
मनसे हा राज्यव्यापी पक्ष नाही, मग त्यांच्या मागे एवढं बळ आले कोठून ?
Prakash AmbedkarSarkarnama

अकोला : भोंगे आणि हनुमान चालिसा यांवरून उठलेले वादळ शमताना दिसत नाही. त्यातच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिलेल्या अल्टिमेटमची ३ मे ही तारीख जवळ येत असल्याने सरकार पूर्ण खरबदारी घेताना दिसत आहे. अशात मनसे हा राज्यव्यापी पक्ष नाही, मग त्यांच्या मागे येवढे बळ आले कोठून, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात ॲड. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) हा राज्यव्यापी पक्ष नाही. मुंबईतही (Mumbai) सर्व प्रभागांत मनसेचा प्रभाव नाही. पण ज्या पद्धतीने भासवले जाते की, राज्यभर यांची असणारी संघटना ही मजबूत आहे. मात्र, राज्यभर ही संघटना मोठी नाही. त्यांचे अस्तित्व काही भागांमध्ये प्रभावशाली आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, मग एवढे बळ यांच्या पाठीमागे आले कोठून, असा प्रश्न उपस्थित करीत कोणत्यातरी पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, असे वाटते. त्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी करून अप्रत्यक्षपणे भाजपला भोंग्याच्या प्रकरणात टारगेट केले आहे.

महाराष्ट्र दिनी शांती मार्च काढणार..

भोंग्याच्या प्रश्नावर ३ मे रोजीची दिलेली मुदत बघता, त्या दिवशी राज्यात अशांतता पसरविण्याचा कट असल्याची भिती ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. राज्यात शांतता रहावी, यासाठी महाराष्ट्र दिन १ मे रोजी सर्व जिल्ह्यांत शांती मार्च काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भोंग्याच्या प्रश्नावरून सोमवारी राज्य शासनाने सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत भोंग्याशिवाय दुसरा कोणताही विषय चर्चेला येऊ दिला नाही. आम्ही ता. ३ मे रोजी राज्यात काहीतरी अघटित घडण्याची शक्यता असल्याचा विषय मांडण्याचा प्रयत्न करीत होतो. राज्य शासनातर्फेही ज्या सूचना दिल्या जात आहे, त्यातून यातून याचे गांभीर्य दिसून येते.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर म्हणाले, समर्पित आयोग ही ओबीसींची फसवणूक

बैठकीत या विषयावर चर्चा होऊ दिली नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. त्यांनी राज्य शासनावर भोंग्याच्या बाबत नवीन धोरण करण्यासाठी केंद्र सरकारला आयता विषय दिल्याचा आरोपही केला. यात शंकेला वाव असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. चौकशीत अडकलेल्या मंत्र्यांना वाचविण्यासाठी भोंग्यांचे नवीन धोरण करून त्यात शिथिलता आणण्यासाठी केंद्र सरकारला संधी दिली असल्याचे ते म्हणाले. याशिवाय भाजपने मसनेमार्फत जी भूमिका घेतली आहे, तीच राज्यातील महाविकास आघाडीची भूमिका आहे, या शंकेलाही वाव असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.