MNS : देशपांडेवर मुंबईत हल्ला, नागपुरात मनसैनिक आक्रमक, केला रास्ता रोको !

Rasta Roko agitation : काटोल-वरुड मार्गावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला होता.
MNS
MNSSarkarnama

Deadly attacks on Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा विरोधात मनसेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हल्ला करणाऱ्या मुख्य सूत्रधारास अटक करण्याची मागणी करण्यात आली.

मनसेचे जिल्हाप्रमुख आदित्य दुरुगकर, उपाध्यक्ष नरेश भोयर यांच्या नेतृत्वात काटोल-वरुड मार्गावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांना बंदोबस्त लावावा लागला. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

दरम्यान रुग्णालयातून बाहेर आल्यावर संदीप देशपांडे यांनी हल्लेखोरांना आणि मुख्य सूत्रधाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबई येथे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून देशपांडेवरील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, देशपांडे यांनीही उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना हल्ल्यामागील मास्टरमाईंडला सूचक इशारा दिला.

असे भ्याड हल्ले करुन कुणी जर आम्हांला घाबरवण्याचा प्रयत्न करणार असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. कधीच आम्ही अशा हल्ल्याला भीक घालत नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे. असंही देशपांडे (Sandip Deshpande) म्हणाले. या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही आरोपी हे भांडूपमधील असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस दोन्ही आरोपींकडे विविध बाजूंनी तापस करीत आहे.

MNS
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी नीतेश राणेंनी घेतले ठाकरेंच्या नातेवाईकाचे नाव

गोपनीय माहितीच्या आधारे दोन जणांना भांडुपमधून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची प्राथमिक कबुली दिली आहे. आता त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुंबई (Mumbai) पोलिसांनी (Police) पत्रकार परिषदेत दिली.

आंदोलनात आदित्य दुरूगकर यांच्यासह रितेश, अनिल नेहारे, साहील ढोकणे,स्वाती जैस्वाल, चेतन गुडधे, सारंग धोटकर, तुषार भुबर, विजय बागडे, रोहित नहारकर, गोलू उबनरे, संदीप कळसे, राकेश वानखेडे, श्रेयस खुजे, प्रणय वरठे, श्रेयश खुजे, योगेश कोडापे, भारत धोटे, शुभम वानखेडे, पीयूष परतेती, चिंटू वानखेडे, सूरज कोडापे, रितिक कठाने, साहील संतपे, अमोल नारनवरे, नितीन पूसतकर, राहुल धामणकर आदींसह मनसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in