आमदार फुके म्हणाले, सही कुणाची घेणार? तत्कालीन दोन्ही पालकमंत्री जेलमध्ये आहेत !

त्यासाठी एकाही सदस्याला बैठकीला बोलावले नाही. परस्परच निर्णय घेऊन निधी मार्गी लावल्याचा आरोप आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuk) यांनी केला.
MLD Dr. Parinay Fuke
MLD Dr. Parinay FukeSarkarnama

नागपूर : गोंदिया (Gondia) जिल्हा डीपीसीची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनमध्ये काल राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यापूर्वीच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी खनिज विकास निधीचे साडेतेरा कोटी रुपये खर्च केले. पण त्यासाठी एकाही सदस्याला बैठकीला बोलावले नाही. परस्परच निर्णय घेऊन निधी मार्गी लावल्याचा आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला.

आमदार फुकेंच्या प्रश्‍नावर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याचे उत्तर मागितले. मायनिंग कमिटीत कोण सदस्य होते, हेसुद्धा पालकमंत्र्यांनी विचारले. त्यावर मायनिंग कमिटीत आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) सदस्य होते. असे अधिकाऱ्याने सांगितले आणि तो कोरोनाचा काळ असल्यामुळे बैठकीला कुणालाच बोलावले नव्हते. मुळात बैठकच झाली नव्हती, तर तत्कालीन पालकमंत्र्यांच्या घरी जाऊन सही घेतली होती. त्यावर या लोकांनी पालकमंत्र्यांचीही परवानगी घेतली होती की नाही, यावर आमदार डॉ. फुकेंनी शंका उपस्थित केली.

हा विषय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय गांभीर्याने घेतला. तेव्हा खनिज विकास निधीचे साडेतेरा कोटी रुपये खर्च केले. पण कायद्यात बदल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तो लागू केलाच नाही, अंमलबजावणीच केली नाही, असे पालकमंत्री म्हणाले. तेव्हा पालकमंत्र्यांची परवानगी घेतली होती की नाही? आधी खर्च करून नंतर सही घेतली का? कारण तेव्हा असे प्रकार चालायचे. खर्च केल्यानंतर सही घेतली असेल तर तसेही खरे सांगा आणि तसेही केले नसेल तर आता माझी सही घ्या, असे पालकमंत्री म्हणाले. बरोबर आहे, कारण तत्कालीन पालकमंत्र्यांची सही ‘बॅक डेट’मध्ये आता होऊ शकणार नाही. कारण ते दोघेही आता जेलमध्ये आहेत, असे आमदार डॉ. फुके म्हणाले. असे म्हणताच सभागृहात हंशा पिकला.

MLD Dr. Parinay Fuke
फडणीसांनी सांगितला, परिणय फुके पालकमंत्री झाल्यावर पहिल्या दौऱ्याचा 'तो' किस्सा..

यानंतर ओबीसींसाठी हॉस्टेलचा मुद्दा आमदार अभिजित वंजारी यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. आमदार डॉ. फुके पालकमंत्री असताना हॉस्टेलला मंजुरी देण्यात आली होती. पण त्यानंतरच्या काळात प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानली. त्यामुळे अजूनही हॉस्टेलचे काम झालेले नाही. त्यावर एसडीओ आणि तहसीलदारांना तात्काळ जागेचा शोध घेऊन हा प्रश्‍न निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com