शिंदे गटातील आमदार प्रचंड अस्वस्थ आणि नाराज, त्यामुळे अफवा पसरवताहेत...

ती नाराजी लपविण्यासाठी ही अफवा पसरविली जात आहे. काँग्रेसमधील कुणीही कुठेही जाणार नसल्याचं अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सांगितलं आहे.
Atul Londhe
Atul LondheSarkarnama

नागपूर : काँग्रेसमधील एक गट भाजपच्या संपर्कात आहे, लवकरच हा गट भाजपमध्ये जाईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या केवळ अफवा आहेत, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिलं आहे. शिंदे गटातल्या ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. ते नाराज आहेत. त्यामुळं ती नाराजी लपविण्यासाठी ही अफवा पसरविली जात आहे. काँग्रेसमधील कुणीही कुठेही जाणार नसल्याचं अतुल लोंढे यांनी सांगितलं आहे.

शिंदे (Eknath Shinde) गटातील ज्या आमदारांना मंत्रिपद देऊ, असे म्हणून आणले गेले आहे, त्यांच्यामध्ये आता अस्वस्थता आहे. त्यांचा आत्मविश्‍वास ढासळत चालला आहे. येवढ्या सगळ्या गोंधळात आपल्याला मंत्रिपद मिळेल की नाही, अशी शंका आमदारांना आहे. पहिले मंत्रिमंडळाचे जे गठण झाले, तेव्हा विस्तारामध्ये तुम्हाला मंत्रिमंडळात घेऊ, असे आश्‍वासन आमदारांना दिले गेले आहे. त्यातच १३ ते १४ लोक आमच्या संपर्कात आहे, असे शिवसेनेचे (Shivsena) नेते सांगत आहेत. परिणामी आमदारांच्या अस्वस्थतेमध्ये वाढ झाली आहे आणि ही अस्वस्थता बाहेर काढण्यासाठी कॉंग्रेसचे (Congress) आमदार फुटणार, अशी अफवा पसरविली जात असल्याचे अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सांगितले. कुणी काहीही अफवा पसरवीत असले, तरी कॉंग्रेसमधील कुणीही कुठेही जाणार नाहीये. या सरकारचा खरा चेहराही लवकरच जनतेसमोर येणार आहे. अशा प्रकारे अफवा पसरवून आमदार फुटत नसतात. तर केवळ संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही लोंढे म्हणाले.

एकीकडे काँग्रेसचे दोन माजी मंत्री हे शिंदे सरकारमध्ये मंत्री होणार असल्याची चर्चा समोर येतेय. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज भेट झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गणेशोत्सव निमित्त भाजप पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी ही भेट झाल्याचं सांगण्यात येतंय. या भेटीदरम्यान चव्हाण आणि फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याचं समजत. तर या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या भेटीवर भाजप नेत्यांनी मौन पाळलं असलं तरी, कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी त्यावर उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

Atul Londhe
Video: फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले...;अतुल लोंढे

अशोक चव्हाण - फडणवीस यांची भेट झाली..

दरम्यान, काँग्रेसमधील एक गट फुटणार असून दोन माजी मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे सरकार मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लांबणीवर पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा विस्तार आता ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे, त्यावेळी काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांचा शपथविधी होणार असल्याचेही सूत्र सांगतात. या सगळ्या गोष्टींवर अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी फक्त आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली. पण आमच्यात कुठलीही बैठक किंवा चर्चा झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे आणि त्यासाठी मी दिल्लीला जाणार असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com