आमदार वंजारी म्हणाले, ‘ती’ चर्चा आम्हाला नेहमीच ऐकायला मिळते !

आता यापुढे हळूहळू लोक रस्त्यांवर येतील आणि सरकारच्या (Central Government) या कृत्याचा जोरदार विरोध सुरू करतील, असे कॉंग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी म्हणाले.
Abhijeet Wanjari
Abhijeet WanjariSarkarnama

नागपूर : देशाला अजून असे किती उदाहरण बघायला मिळणार आहेत, माहिती नाही. देशातील जनतेला माहिती आहे की शिवसेना (Shivsena) पक्षाला संपवण्यासाठी हे मोठे षडयंत्र आहे. तरीही गेल्या काही वर्षांपासून सरकारी यंत्रणांचा दुरूपयोग करण्याचे काम सुरू आहे. दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. आता यापुढे हळूहळू लोक रस्त्यांवर येतील आणि सरकारच्या (Central Government) या कृत्याचा जोरदार विरोध सुरू करतील, असे कॉंग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी म्हणाले.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) (ED) कारवाया सुडबुद्धीने सुरू आहेत. ईडीचे अधिकारी सुटीच्या दिवशी जी कार्यतत्परता दाखवित आहेत. जो कुणी नेता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतो, त्या नेत्याला अडकवण्याचे काम खुलेआम केले जात आहे. त्यामुळे देशात लोकशाही उरली की नाही हा प्रश्‍न लोकांना पडतो आहे. ती चर्चा आम्हाला अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळते. देशात सध्या जे काही सुरू आहे, ते योग्य नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. आता लोक रस्त्यांवर येऊन उठाव करतील, तेव्हाच यांना कळेल, असे आमदार वंजारी (Abhijeet Wanjari) म्हणाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काल बिहारच्या पटनामध्ये केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, महाराष्ट्रात किंवा देशामध्ये फक्त भाजपच आहे, असा समज कुणीही करून घेण्याचे काही कारण नाही. कॉंग्रेस पक्ष आजही मजबूत आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ते दाखवून देऊ. महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्ष मजबुतीनं उभे आहेत. येणाऱ्या काळात भाजपच्या लोकांची जी काही खेळी सुरू आहे, ती आम्ही लोकांसमोर आणू. कारण शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच जी कारवाई झाली, ती कशातून झाली, हेसुदधा लोक जाणून आहेत, असेही आमदार वंजारी यांनी सांगितले.

Abhijeet Wanjari
संजय राऊत दोषी नसतील, तर ईडी चौकशीच्या फेऱ्यातून ते सुखरूप बाहेर पडतील !

देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत जो कारभार भाजपने करून ठेवला, त्यानंतर त्यांना जनतेसमोर जाण्याची वेळ अद्याप आलेली नाही. लवकरच ती वेळ येणार आहे आणि जनता यांना योग्य उत्तर देईल. कारण पेट्रोल, डिझेल, गॅसपासून ते दुध, दही आणि सांभाराच्या काडीपर्यंत सर्वच वस्तुंवर जीएसटी लादण्यात आला आहे. यामुळे सामान्य माणूस आणि गृहीणी संतापल्या आहेत. त्यांचा संताप लवकरच उफाळून येईल आणि हुकुमशहांना सळो की पळो करून सोडेल, असे आमदार अभिजिच वंजारी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com