आमदार ठाकरे म्हणतात, २७ महापालिका आयुक्तांवर करा कारवाई...

आमदार ठाकरे MLA Vikas Thakre यांनी अध्यक्षांना भेटून लेखी पत्र दिले आहे. त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे.
आमदार ठाकरे म्हणतात, २७ महापालिका आयुक्तांवर करा कारवाई...
Vikas ThakreSarkarnama

नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या आयुक्तांनी सरकारला आणि जनतेलाही फसवले आहे. वस्तू व सेवा कर लागू असताना सर्व आयुक्तांनी जनतेकडून इतर सर्व कर वसूल केले. त्यामुळे राज्यातील २७ महानगरपालिकांच्या आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.

वारंवार पत्र दिल्यानंतरही उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याने तसेच दिशाभूल करणारी, चुकीची माहिती दिल्याबद्दल आमदार विकास ठाकरे यांनी राज्यातील २७ महापालिका आयुक्तांच्या विरोधात विशेषाधिकार भंग व अवमानना केल्याने शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. आमदार ठाकरे यांनी यापूर्वी सर्व महानगरपालिका आयुक्तांना या प्रकाराची माहिती मागवली होती. पण एकमेव नगरच्या आयुक्तांनी जाहिरात कर घेणे बंद केले. पण त्याव्यतिरिक्त एकाही आयुक्तांनी पत्राला साधे उत्तरही दिले नाही, असे त्यांनी सांगितले.

आमदार ठाकरे यांनी अध्यक्षांना भेटून लेखी पत्र दिले आहे. त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. चार वर्षांपासून

वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ता कर, पाणी कर, जाहिरात कर असे अनेक कर आपसूकच रद्द झाले आहेत. मात्र सर्वच महापालिका आयुक्तांनी जीएसटीच्या स्वरूपात केंद्र व राज्य सरकारकडून भरपाई घेतली तर दुसरीकडे नागरिकांकडूनही कर वसूल केला आहे. एकट्या नागपूर महापालिकेत तीन वर्षांत सुमारे अडीच कोटी रुपये वसूल करण्यात आले असल्याचे विकास ठाकरे यांचे म्हणणे आहे.

ही सरकारची फसवणूक आणि नागरिकांची पिळवणूक असल्याचा आरोप ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. याबाबत सातत्याने नागपूरसह अनेक महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे याचा खुलासा मागितला होता. मात्र एकाही आयुक्ताने त्याबाबत आपणास माहिती दिली नाही. आपल्या पत्रानंतर नगरच्या आयुक्तांनी जाहिरात कर घेणे बंद केले. एकाही पत्राला उत्तर दिले जात नसल्याने आयुक्तांमार्फत काहीतरी लपवाछपवी सुरू असल्याची शंका येते. याविरोधात उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले.

Vikas Thakre
शिवसेनेच्या फोडाफाडीबाबत समन्वय समितीने निर्णय घ्यावा : विकास ठाकरे

विधानसभेत हा विषय चर्चेला आल्यानंतर चांगलेच घमासान होणार, असे सांगितले जात आहे. जनता आणि सरकारची एकाच वेळी फसवणूक राज्यातील २७ आयुक्तांनी केली, त्यावर कळस म्हणजे पत्राला साधे उत्तरही दिले नाही. त्यामुळे आमदार ठाकरे चांगलेच संतप्त झाले आहेत आणि त्यांनी हक्कभंग दाखल केला आहे. हा विषय चर्चेला आल्यानंतर काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.