Nana Paole : नाना पटोलेंच्या दौऱ्यात आमदार सुलभा खोडके गायब, चर्चांना उधाण...

नाना पटोले (Nana Patole) यांनी शहर व ग्रामीण भागांतील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
Nana Patole and Sulbha Khodke
Nana Patole and Sulbha KhodkeSarkarnama

अमरावती : अमरावतीच्या कॉंग्रेस आमदार सुलभा खोडके यांच्याबद्दल शहरासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर आहेत. भारत जोडो अभियानाअंतर्गत अमरावती शहरासह जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात आमदार खोडके दोन्ही दिवस गायब होत्या.

आमदार ही महत्वाची व्यक्ती प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात गायब असल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या (NCP) गोटातही कुजबुज सुरू झाली. आमदार खोडके राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (Congress) तर गेल्या नाहीत ना, अशीही शंका काहींनी उपस्थित केली. कारण त्यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आहेत. राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे ते कट्टर समर्थक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या शंकेला बळ मिळते, असे काहींचे मत पडले.

नाना पटोले यांनी शहर व ग्रामीण भागांतील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यामध्ये व्यापारी, डॉक्टर्स, वकील, मुस्लिम संघटना यांसोबतच अमरावती शहरातील विविध सामाजिक संघटनांसोबत त्यांनी बैठका घेतल्या. मात्र या संपूर्ण दोन दिवसांच्या बैठकांमध्ये अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके कुठेही दिसल्या नाहीत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. पुढील काळात सुलभा खोडके काँग्रेसमध्ये राहतील की नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावती विधानसभा मतदार संघ हा कॉंग्रेससाठी सोडण्यात आला होता. त्यामुळे खोडके यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली. अन्यथा आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके, हे अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जुळले आहेत. मागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अमरावतीला आले असताना अमरावती विभागातील पदाधिकारी व कायकर्त्यांचा मेळावा संजय खोडके यांनीच आयोजित केला होता. त्यामुळेच भविष्यात आमदार खोडके कॉंग्रेसमध्ये राहणार की राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार, हा प्रश्‍न चर्चिला जात आहे.

Nana Patole and Sulbha Khodke
Congres| महापालिका निवडणूका स्वबळावरच लढणार; नाना पटोले

मी कॉंग्रेसमध्येच..

मी काँग्रेसमध्येच आहे, यापुढेही काँग्रेस पक्षाकडूनच निवडणूक लढवणार. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यामध्ये अनुपस्थित राहिली, याबाबत दिलगिरी व्यक्त करते. अशी पोस्ट आमदार सुलभा खोडके यांनी फेसबुकवर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in