आमदार संजय राठोड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…

सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर (Corona) मात करून लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होईल, असे त्यांनी (MLA Sanjay Rathod) ट्विटमध्ये म्हटले आहे.
आमदार संजय राठोड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह…
MLA Sanjay Rathod Tested Covid PositiveSarkarnama

नागपूर : देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. अनेक राजकीय नेते, मंत्री (Minister) यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवसेना नेते, आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांना कोरोनाची लागण झाली. राठोड यांनी ट्विट करीत ही माहिती दिली. ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी उपचार घेत आहेत. (MLA Sanjay Rathod Tested Covid Positive)

आमदार राठोड यांना कोरोनाची सैाम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी, असे राठोड यांनी ट्विट करून सांगितले आहे. ते होम क्वारंटाइन आहेत. कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कळताच त्यांनी स्वत:ला विलग केले. सर्वांनी योग्य ती काळजी घ्या व नियमांचे काटेकोरपणे पालन करा, असेही राठोड यांनी सांगितले आहे. सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेत रुजू होईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकार वारंवार विविध मार्गांनी जनतेला त्याबाबत अवगत करत आहे. पण लोकांनी अद्यापही बाजारांत आणि रस्त्यांवर गर्दी करणे थांबविलेले नाही. राज्यातील १३ मंत्री आणि जवळपास ७०च्या वर आमदार कोरोनाबाधित झाल्यानंतरही लोकांनी तिसरी लाट गांभीर्याने घेतलेली नाही. दुसऱ्या लाटेसारखी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी लोकांनी आत्ताच जागरूक होण्याची गरज आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले पुढारीही सातत्याने जनतेला आवाहन करीत आहे. या लाटेकडे लोकांनी दुर्लक्ष करू नये आणि सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही आमदार संजय राठोड यांनी केले आहे.

MLA Sanjay Rathod Tested Covid Positive
संजय राठोड म्हणतात...सत्य परेशान हो सकता है पराजित नही! 

मुंबईमध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. पण आता मुंबईकरांना सलग दुसऱ्या दिवशीही दिलासा मिळाला आहे. आज दुसऱ्यादिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी मुंबईत 11 हजार 647 रुग्ण आढळले आहे. गेल्या पाच दिवसातलीही सर्वात कमी संख्या आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांची संख्याही 25 हजारांच्या पुढे गेली होती. पण, रुग्णांची संख्या ही कमी कमी होत चालली आहे. काही दिवसांपासून दर दिवशी 20 ते 25 रुग्ण संख्या आढळून येत होती. तीच संख्या आता 11647 वर येऊन पोहोचली आहे. शहरातील 80 टक्के हॉस्पिटलमधील बेड रिकामे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.