Lonar Bazar Samiti Results : आमदार रायमुलकरांनी गड राखला; आघाडीला चारली धुळ

Bazar Samiti Results : बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार जाधव आणि आमदार रायमुलकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
Sanjay Raimulkar News
Sanjay Raimulkar NewsSarkarnama

Lonar Bazar Samiti : लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar) यांनी आपला गड राखला आहे. लोणार बुलडाण्याचे (Buldana) खासदार प्रतापराव जाधव (Pratabrao Jadhav) यांच्या गड मानला जातो. या बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार जाधव आणि आमदार रायमुलकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, त्यांनी आघाडीला धुळ चारली आहे.

या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने 18 पैकी 12 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडी अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागेल आहे. या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने चांगलेच आव्हान उभे केले होते. मात्र, शिवसेनेने येथे बाजी मारली.

Sanjay Raimulkar News
Paithan APMC Result News : पैठण भुमरेंचेच, सर्व १८ जागा जिंकल्या, आघाडी फेल..

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिंदे गटाचे विजयमी उमेदवार जगाराव आडे, मोतीराम डव्हळे, भगवान कोकाटे, युवराज सोनुने, बळी भाऊ मापारी, संजय आटोळे, शांताबाई मुढे, शिव पाटील तेजनकर, संतोष भाऊ मापारी, कारभारी सानप, सुनील सुलताणे, विठ्ठल जाधव. महाविकास आघाडीचे विजयमी उमेदवार सुखदेव शिंदे, अनिरुद्ध गायकवाड, तेजराव घायाळ, मिरा भुषण मापारी, विजय मोरे, शिवप्रसाद सारडा हे विजयी झाले आहेत.

दरम्यान, शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. 18 जागासाठी झालेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत 38 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सहकार पॅनल व शेतकरी पॅनल मध्ये झालेल्या सरळ लढतीत, सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी मोठया फरकाने शेतकरी पॅनलचा सफाया केला.

Sanjay Raimulkar News
Parseoni APMC Election Results : केदारांशी लढता लढता भाजपची झाली दमछाक, पारशिवनीत उडवला धुव्वा…

काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे सहकार पॅनल होते. तर शेतकरी पॅनल हे भाजप व शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांचे होते. शेगाव मतदार संघ हा भाजपचा (BJP) गड असून संजय कुटे (Sanjay Kute) हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे संजय कुटे यांना मोठा धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com