शिंदे गटाचे आमदार म्हणाले, '...तर आम्ही आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपत बसू'

MLA Sanjay Gaikwad News : उद्धव ठाकरेंना दिलं जाहीर आव्हान!
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay GaikwadSarkarnama

MLA Sanjay Gaikwad News : उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.२६ नोव्हेंबर) बुलडाण्यात जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. त्यामध्ये ४० रेडे गुवाहाटीला गेले, हे खोके सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी हल्लबोल केला.

त्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंना जाहीर आव्हान दिलंय. ''उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सीआयडी (CID) लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा, त्यांनी एकदा तरी हे सिद्ध केलं तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू'', असं गायकवाड म्हणाले. ते एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलत होते.

ठाकरेंच्या टिकेला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, ''शेतकऱ्यांचा मेळावा म्हणून त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. मात्र जेवढ्या लोकांनी तिथे भाषण केले त्यापैकी कुणीही शेतकऱ्यांविषयी बोललं नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने काय करावं हे विरोधीपक्ष म्हणून ते काहीही सांगू शकले नाहीत. ते जे काही बोलले ते खोके, बोके याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही विषय नव्हता. त्यामुळे त्यांच्या या शेतकरी मेळाव्यातून काहीच निष्पन्न झालं नाही'', असं त्यांनी सांगितलं.

MLA Sanjay Gaikwad
राज्यपालांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका? मुनगंटीवारांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

''खोक्यांशिवाय गेल्या तीन-चार महिन्यांत त्यांना दुसरा कुठला विषय मांडता आला का?, उद्धव ठाकरेंनी सीआयडी आणि जेवढ्या चौकशीच्या यंत्रणा असतील त्या लावून या खोके घेतल्याचा एक तरी पुरावा आणून दाखवावा. जर त्यांनी असं केलं तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू, मात्र त्यांनी हे एकदा सिद्ध करून दाखवावं'', असं थेट आव्हान गायकवाडांनी ठाकरेंना दिलं.

दरम्यान, ''मातोश्रीवर आत्तापर्यंत जेवढे खोके गेले, त्याच्या एक टक्क्यांमध्ये देखील आमचा विषय नाही. मात्र, त्यांच्या यंत्रणांना या ४० खोक्यांचा शोध घ्यावा लागेल, असं सूचक विधान आमदार गायकवाड यांनी केलं. त्यामुळे आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येतं, ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com