आमदार समीर मेघे म्हणाले, ‘त्या’ ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करा...

या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांनी निवेदनाद्वारे ठाणेदार बळीराम परदेशी यांच्याकडे शनिवारी केली.
MLA Sameer Meghe HIngna
MLA Sameer Meghe HIngnaSarkarnama

हिंगणा (जि. नागपूर) : तालुक्यातील मंगरूळ येथे विकासकामाच्या फलकाच्या अनावरणाप्रसंगी आमदार समीर मेघे (Sameer Meghe) यांचे नाव खोडण्यात आले. याला ग्रामसेवक डी.डी. शेंडे जबाबदार आहेत, असा आरोप करत आमदाराचा (MLA) अवमान केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार समीर मेघे यांनी निवेदनाद्वारे ठाणेदार बळीराम परदेशी यांच्याकडे शनिवारी केली.

नागपूर जिल्ह्याच्या (Nagpur District) हिंगणा तालुक्यातील मंगरूळ येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत ५ लाख रुपयांचे मंजूर सिमेंट रस्ता बांधकाम पूर्ण झाले. या रस्त्याचे लोकार्पण ४ जानेवारीला पार पडले. यासाठी लोकार्पण फलक तयार करण्यात आला. या फलकावर स्थानिक सरपंच कविता सोमकुवर यांनी आमदार समीर मेघे यांचे नाव सुचविले होते. त्यानुसार फलकावर आमदारांचे नाव लिहिण्यात आले. परंतु ४ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लोकार्पण केले. लोकार्पण सोहळ्याच्या फलकावर आमदार समीर मेघे यांचे नाव काळ्या रंगाने पुसून हा फलक लावण्यात आला. त्यामुळे सरपंचसुद्धा या लोकार्पण सोहळ्याला गेले नाही.

या प्रकारामुळे भाजप पदाधिकारी संतप्त झाले. ५ जानेवारीला भाजपने खंडविकास अधिकारी बाळासाहेब यावले यांच्याकडे निवेदन देऊन येथील ग्रामसेवक डी.डी. शेंडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली. या बांधकामाचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून दिला जातो. आमदार या समितीचे सदस्य आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या फलकावर असलेल्या नावाला पुसण्यात आले. हा लोकप्रतिनिधीचा अपमान असून जबाबदार अधिकारी म्हणून ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रेटून धरण्यात आली. यानंतर कारवाईचा कुठलाही अहवाल प्राप्त झाला नाही.

MLA Sameer Meghe HIngna
राज्यातील दहा सर्वोत्कृष्ट आमदारांत समीर मेघे : बावनकुळे

या प्रकरणावरून संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी आज शनिवारी पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदारांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात हिंगणा तालुका भाजपचे अध्यक्ष धनराज आष्टनकर, पंचायत समिती सदस्य संजय ढोडरे, सुजित भोयर, विशाल भोसले, उमेश आंबटकर, विकास दाभेकर, अनिल चानपुरकर, मधुकर वलके, गजेंद्र खोबे, विक्की कैकाडे आदींचा समावेश होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com