MLA Recruitment Advertisement : नेटकऱ्यांनी ‘अशी’ काढली कंत्राटी आमदार भरतीची जाहिरात !

Maharashtra : राज्यात विविध विभागांच्या पदांकरिता परीक्षा घेण्यात येत आहेत.
MLA Recruitment Advertisement
MLA Recruitment AdvertisementSarkarnama

Chandrapur Political News : लोकसभा विधानसभा निवडणुकांना वेळ असला तरी आतापासूनच राजकीय पक्षांनी तयारी चालविली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने तब्बल १० वर्षांनंतर नोकर भरती काढली. यानंतर मात्र शासकीय नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने भरण्याचे आदेश काढले आहेत. (Examinations are being conducted for the posts of various departments in the state)

राज्यभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. यामुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी आता थेट कंत्राटी पद्धतीने आमदार भरतीची जाहिरात काढली आहे. हा विषय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या राज्यात विविध विभागांच्या पदांकरिता परीक्षा घेण्यात येत आहेत. अनेक नव्या पदभरतीच्या जाहिराती दिल्या जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तब्बल १० वर्षांनंतर मेगाभरती काढण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत आनंद आहे.

चार हजार जागांसाठी तब्बल दहा लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले. यावरून बेरोजगारीचे स्वरूप किती भयानक आहे हे स्पष्ट होते. एकीकडे मेगाभरती निघाल्याचा आनंद होत असतानाच दुसरीकडे मात्र सरकारने यापुढे शासकीय नोकर भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल आणि याकरिता नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असल्याची घोषणा केली आहे.

शासनाचा (State Government) या निर्णयाने राज्यभरात संतापाची लाट आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या मुद्द्यावरून हे सरकार नालायक असल्याचा घणाघाती आरोप केला. या मुद्द्यावरून त्यांनी तरुणाईला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा सल्ला दिला. तुमचे भविष्य उद्ध्वस्त करणारा हा निर्णय असल्याने आताच ‘आर या पार’ची लढाई लढावी लागेल. एकजूट होऊन शासनाच्या चुकीच्या निर्णयाचा विरोध करावा लागेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता सोशल मीडियातून सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध होऊ लागला आहे. नेटकऱ्यांनी थेट कंत्राटी आमदार भरतीची जाहिरात सोशल मीडियातून काढली आहे. विधानसभा व विधानसभेचे आमदार होण्यासाठी विविध अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने कंत्राटी आमदार भरतीसाठी नऊ कंपन्यांना कंत्राट दिले आहे.

नेटकऱ्यांनी विविध अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. खोके घ्यायची क्षमता असावी, सुरत गुवाहाटी प्रवासाची क्षमता असावी, निष्ठा क्षणाक्षणाला बदलण्याची हिंमत असावी, यांसह काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. यापुढे शासकीय नोकरी केवळ कंत्राटी पद्धतीने होईल. हा निर्णय तरुणांच्या स्वप्नाचा चुराडा करणार असल्याने राज्यभर या निर्णयाचा विरोध होत आहे.

आता नेटकऱ्यांनी समाजमाध्यमांतून कंत्राटी आमदार भरती काढत रोष व्यक्त केला आहे. शासकीय नोकरी संपविण्याचा हा सरकारचा डाव आहे. यामुळे येणाऱ्या काळात तरुणाईची अवस्था अतिशय बिकट होणार आहे. कंत्राटी नोकरी भरती काढल्याच्या निर्णय घेतल्याने राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांत कमालीचा संताप पसरला आहे.

Edited By : Atul Mehere

MLA Recruitment Advertisement
Chandrapur ZP Officer News : लेखा अधिकाऱ्याने सरकारचे कोट्यवधी वाचविले, आता अर्जित रजेचे रोखीकरण नाही !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in