१५ दिवसांनंतर परतलेल्या आमदार रवी राणांचे अमरावतीत जंगी स्वागत...

मुख्यमंत्री (Chief Minister) आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब (Anil Parab) यांच्यासारख्या मंत्र्यांचे घोटाळेदेखील लवकरच समोर येतील, असे आमदार राणा (Ravi Rana) म्हणाले.
MLA Ravi Rana, Amravati.
MLA Ravi Rana, Amravati.Sarkarnama

अमरावती : आमदार रवी राणा पंधरा दिवसांनंतर आज अमरावती शहरात आले. इर्वीन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांनी महापालिका प्रशासन व महाविकास आघाडीच्या विरोधात रॅली काढत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आमदार त्यांचे स्वागत केले.

आमदार राणा (Ravi Rana) आज दिल्लीहून नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आले. त्यानंतर ते थेट अमरावतीला (Amravati) पोचले. मी दिल्लीत असताना माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करतात, ही माझी फसवणूक आहे. आज मी दिल्लीतील न्यायालयातून (Court) ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. अमरावतीच्या पालकमंत्री (Guardian Minister) यांचा १२०० कोटी रुपयांचा घोटाळा लवकरच उघडकीस येणार आहे. ईडी त्याचा तपास करत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब (Anil Parab) यांच्यासारख्या मंत्र्यांचे घोटाळेदेखील लवकरच समोर येतील, असे आमदार राणा म्हणाले.

अमरावती महापालिकेने शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री छन्नी हातोडीने तोडला. त्यांच्यावर कारवाई न करता मी दिल्लीत असताना माझ्यावर कारवाई करण्यात आली. पंधरा दिवसांनंतर आज मी अमरावतीमध्ये आलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण केले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हारार्पण करणार. आणि अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात निषेध रॅली काढली. या रॅलीतही कुठलाही गोंधळ नाही, तर शांततेच्या मार्गाने आम्ही प्रशासनाचा आणि राज्य सरकारचा विरोध करीत आहो, असे आमदार राणा म्हणाले.

MLA Ravi Rana, Amravati.
video : महाराष्ट्राची काय स्थिती या ठाकरे सरकारने केलीय? : रवी राणा

पोलीस विभाग आणि सरकारनं मला फसविण्याचा प्रयत्न केला आहे. आता याला सडेतोड उत्तर देणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडून दबाव टाकून माझ्यावर कलम ३०७चा खोटा गुन्हा दाखल केला. पण आता त्यासुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. १२०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावरही लवकरच कारवाई केली जाणार आहे, असही आमदार राणा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com