
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी भाजपच्या नावावर मते मागितली. पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadanvis) राज्यकारभार केला आणि त्याच फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दांत आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (Ravi Rana Criticized on Cm Uddhav Thackeray)
''सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कटप्पाचा रोल करत आहे, अशी टीकाही रवी राणा यांनी केली. पंतप्रधान मोदींच्या नावे मते मागितली, पाच वर्षे सत्तेत राहिले आणि नंतर दूसऱ्यासोबत संसार थाटला, असंही राणा यांनी म्हटलं आहे. संभाजीराजे छत्रपती आज राज्यातील जनतेच्या मनात आहेत पण मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे छत्रपती यांनाही धोका दिला, असा आरोपही त्यांनी केला. जे छत्रपतींचे झाले नाही ते महाराष्ट्राचे कसे होणार अशी घणाघाती टीकाही आमदार राणा यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी राणा दांपत्य अमरावतीत दाखल झाले. तब्बल दिड महिन्यांच्या कालावधीनंतर अमरावतीत आगमन होताच समर्थकांनी राणा दाम्पत्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागतही केलं. याशिवाय ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले. विशेष म्हणजे, राणा दांपत्य त्यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवासस्थानी पोहचल्यानंतर रात्री राणा दांपत्याचा दुग्धभिषेक सोहळा पार पडला.
अमरावतीतील शंकर नगर परिसरात राणा यांच्या घरासमोरच त्यांनी हा मोठा सोहळा केला. या प्रकरणी रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण करणे आणि रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावून शक्ती प्रदर्शन करणे, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक स्वाती पवार यांच्या तक्रारीवरुन राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, जितू दुधाने, बाळू इंगोले प्रवीण गुल्हाने, अजय मोरया, जयश्री मोरया, साक्षी उमप अधिक 8 ते 10 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.