आमदार राणा संतापले; म्हणाले, सीपींनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला...

वाझेसारखे (Sachin Waze) अधिकारी जर तुम्ही तयार करीत असाल, तर उद्या तुमचीही गत अनिल देशमुखांसारखी झालेली असेल, असेही राणा (Ravi Rana) म्हणाले.
MLA Ravi Rana
MLA Ravi RanaSarkarnama

नागपूर : शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा राजापेठ उड्डाणपुलावरून हटवल्यानंतर संतापलेल्या शिवभक्तांनी पालिका आयुक्तांवर शाई फेकली. या घटनेचे मी समर्थन करणार नाही, तर निषेधच करीन. पण मी तेव्हा दिल्लीला होतो. असे असताना अमरावतीत माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सीपींनी खोटं गुन्हा दाखल केला, असे आमदार रवी राणा यांनी आज सभागृहात सांगितले.

आमदार राणा (Ravi Rana) म्हणाले, रेल्वे विभागाच्या एका बैठकीला उपस्थित होतो. तेव्हा मला कॉल आला की, अमरावतीमध्ये माझ्यावर ३०७, ३५३ चा गुन्हा दाखल झाला. जेव्हा या प्रकाराची माहिती घेतली, तेव्हा या सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) प्रमुख लोकांना पोलिस आयुक्तांवर दबाव टाकून माझ्यावर हा गुन्हा दाखल करायला लावला. येवढेच नाही तर रात्री ३ वाजता १०० ते १५० पोलिस माझ्या घरी गेले. माझे वृद्ध आईवडील घरी होते, तेव्हा तेवढ्या रात्री माझ्या घराची तपासणी केली.

राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अनेक शिवभक्तांनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. १२ तारखेला पुतळा बसवल्यानंतर त्याठिकाणी दुग्धाभिषेक झाला, आरती झाली. दिवाळीसारखं वातावरण अमरावती शहरात होतं, कुणाची तक्रार नव्हती. अशा परिस्थितीत ५ दिवसांनंतर महानगरपालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत छन्नी हातोड्यांनी काढल्या गेले. आणि कचरा ठेवण्यासाठी अतिक्रमण विभागाच्या गोदामात महाराजांचा पुतळा टाकला गेला. आमचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा गोदामात टाकल्यामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या.

MLA Ravi Rana
नवाब मलिकांनंतर आता 'या' मंत्र्याचा १२०० कोटींचा घोटाळा बाहेर काढणार- रवी राणा

खासदार नवनीत राणा यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांचा अपमान केला. या सरकारमधील प्रमुख लोकांना पोलिस आयुक्तांना कॉल करून हे सर्व करायला लावले, याचा पुरावासुद्धा माझ्याकडे पेन ड्राईव्ह मध्ये आहे. या सरकारमध्ये चांगले मंत्री राहिलेले नाहीत, या क्षणी आर. आर. पाटील यांची आठवण येते, ते असते तर असा अन्याय झाला नसता, असेही आमदार राणा म्हणाले. वाझेसारखे अधिकारी जर तुम्ही तयार करीत असाल, तर उद्या तुमचीही गत अनिल देशमुखांसारखी झालेली असेल, असेही राणा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com