पोलिसांना शिवीगाळ राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अंगलट; माफी मागितली

आमदार कारेमोरे यांनी पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांना शिविगाळ केली होती.
MLA Raju Karmore

MLA Raju Karmore

Sarkarnama 

भंडारा : आमदार राजू कारेमोरे (MLA Raju Karmore) यांना 50 लाखांच्या लुटीची तक्रार केली होती. आपल्या मित्राला मारहान केल्याचा आरोप करत त्यांनी पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांनी (Police) शिविगाळ केली होती. आमदारांचा शिविगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल (Social Media) मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आमदारांनी आज पत्रकार परिषद घेत माफी मागितील आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कारेमोरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे दोन व्यापारी मित्र हे घरून 50 लक्ष रुपयांची रोकड आर्टीकातून तुमसरकडे घेऊन जात होते. गाडी वळवताना इंडेकेटर का दाखवलना नाही म्हणून मोहाडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना पाठलाग करून अडवले. हा वाद वाढत गेला आणि गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाहीतर 50 लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली होती. त्यानंतर आमदार कारेमोरे यांनी पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांना शिविगाळ केली होती.

<div class="paragraphs"><p>MLA Raju Karmore</p></div>
अजितदादांनी कार्यकर्त्यांनाही दुखावले नाही आणि नियमही मोडला नाही!

पोलिस स्टेशनमध्ये घातलेला गोंधळ आणि पोलिसांना केलेल्या शिविगाळीच्या प्रकरणानंतर आमदार अडचणीत सापले होते. त्यावर त्यांनी माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, पोलिसांनी केलेली मारहाण व कारवाई करण्यास लावलेला विलंब यामुळे संतापून माझ्या तोंडून अपशब्द बाहेर आले. याबाबत मी माता-भगिनी व सर्व जनतेची माफी मागतो.

या वेळी कारेमोरे यांनी पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. व्यापाऱ्याला अडवून रस्त्यावर मारहाण करणाऱ्या पोलिसांची ड्यूटी कुठे होती. स्टाँग रुन १०० मीटर लांब असताना पोलिस बाहेर कसे आले? पोलिसांनी ५० लाख रुपये व ५ तोळ्यांची सोनसाखलीची राॅबरी कसी केली. हा कट पूर्वनियोजित होता का असे अने सवाल त्यांनी केले आहे. तसचे त्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांवर कारवाई झाली नाहीतर आम्ही आंदोलन करुन असा इशाराही कारेमोरे यांनी दिला आहे.

<div class="paragraphs"><p>MLA Raju Karmore</p></div>
अजित पवार म्हणाले, त्या दोघांनाही मी सांगत होतो पण ते हट्टालाच पेटले होते!

दरम्यान, जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आचारसंहिता सुरु आहे. या काळात कोणत्याही मोठ्या रकमेची वाहतूक करताना भंडारा जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. नियुक्त केलेल्या फ्लाइंग स्काॅडला तशी माहिती द्यावी लागते. मात्र आमदार व त्यांच्या जिवलग मित्रांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ठ झाले आहे. इतकी मोठी रक्कम वाहतूक करत असताना लूटमार होण्याचा धोका असू शकतो. मग त्याची पूर्वकल्पना पोलिसांना का दिली नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे एक लाख रुपयांवरील रक्कमेचे व्यवहार करतांना चेक अथवा शासकीय नियमात असलेल्या सुविधेनुसार NEFT किंवा RTGS ने रक्कम देता येणे शक्य होते. एवढ्या मोठ्या रकमेच्या रोख व्यवहाराची माहिती पोलिसांना आता प्राप्तिकर विभागाला दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com