Praniti Shinde : आमदार प्रणिती शिंदेंनी घेतला ‘भारत जोडो’च्या नियोजनाचा आढावा...

यात्रा कशा प्रकारे आकर्षक वाटेल, यासाठी नियोजन करावे. अशा सूचना आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी यावेळी दिल्या.
Praniti Shinde, Akola
Praniti Shinde, AkolaSarkarnama

अकोला : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो पदयात्रा ही लवकरच अकोला जिल्ह्यात येणार आहे. या पदयात्रेच्या नियोजनाची आढावा बैठक काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नेतृत्वात अकोला येथील स्वराज्य भवन येथे पार पाडली.

या बैठकीचे आयोजन अकोला (Akola) महानगर काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांनी केले होते. यावेळी मंचावर जावेद अन्सारी, प्रकाश तायडे, मदन भरगड, अशोक अमानकर, सुधीर ढोणे, साजिदखान पठाण, डॉ.झिशान हुसैन, प्रदीपकुमार वखारीया, महेंद्र गवई, रवी शिंदे, आकाश कवडे, अविनाश देशमुख, मो. इरफान, निखिलेश दिवेकर हे उपस्थित होते.

खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा ही अकोला जिल्ह्यात येणार असून, या यात्रेच्या नियोजनासाठी जनतेत उतरा, जनतेशी संवाद करा, सामान्य तळागाळातील शेवटच्या घटकाला या पदयात्रेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा. राहुल गांधींची ही यात्रा देशात परिवर्तनाची लाट आणणारी असून, विरोधकांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ही यात्रा आहे. सदर यात्रेत संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला सामील करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे यात्रा कशा प्रकारे आकर्षक वाटेल, यासाठी नियोजन करावे. अशा सूचना आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिल्या.

Praniti Shinde, Akola
Praniti shinde Video : महागाईमुळे प्रणिती शिंदे यांनी केंद्राला फटकारले...

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रेचा शुभारंभ ७ सप्टेंबर रोजी झाला. सुरुवातीपासूनच पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधींची ही पदयात्रा नक्कीच देशात परिवर्तन घडवेल, सदर ऐतिहासिक यात्रा ही अकोल्यातसुद्धा येत आहे, जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० किलोमीटरचे अंतर ही पदयात्रा गाठणार आहे. त्यामुळे या पदयात्रेने संपूर्ण जिल्हाच काँग्रेसमय होणार असल्याचे प्रतिपादन प्रकाश तायडे यांनी केले. यावेळी मंचावर उपस्थित अन्य मान्यवरांनी सदर पदयात्रा यशस्वी करण्यासाठी विविध सूचना केल्यात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in