Parinay Fuke : भंडारा-गोंदियातील लोकांना आमदार परिणय फुके दिवाळीला देणार ‘ही’ भेट

पंतप्रधान आवास योजनेचा उर्वरित निधी संबंधितांना मिळणार आहे, असे भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी सांगितले.
MLC Dr. Parinay Fuke
MLC Dr. Parinay FukeSarkarnama

नागपूर : गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नगरपरिषद व नगर पंचायतीअंतर्गत हजारो लाभार्थी पंतप्रधान आवास योजनेच्या उर्वरित निधीपासून वंचित आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे हा निधी प्रलंबित आहे. प्रत्येक माणसाला आपले घर बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचे स्वप्न भंग करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. परिणामी लोक हक्काच्या घरांपासून वंचित राहिले.

केंद्र सरकारची (Central Government) घरकुल योजना यशस्वी होऊ नये, यासाठी ज्यांनी कुणी प्रयत्न केले, ते जनतेच्या लक्षात आले आहे. आता येत्या २४ तासांच्या आत पंतप्रधान (Prime Minister) आवास योजनेचा उर्वरित निधी संबंधितांना मिळणार आहे, असे भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी सांगितले. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची मुंबईत भेट घेतली. गरिबांना त्यांच्या स्वप्नातील घरापासून दूर ठेवण्याचे काम मागील सरकारने केले. आता दिवाळी हा महत्वाचा सण तोंडावर आला आहे. तरीही घरकुल योजनेच्या निधी न मिळाल्याने गरिबांची दिवाळी अर्धवट राहणार आहे. त्यांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी गृहनिर्माण योजनेची रखडलेली रक्कम देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे, असे आमदार डॉ. फुके यांनी या भेटीत सांगितले.

आमदार फुके यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायतीअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी उर्वरित रक्कम वाटप करण्याचे निर्देश संबंधित म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले. फडणवीसांच्या या भूमिकेमुळे शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेचे सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मागील सरकारने राज्यातील जनतेला अनेक योजनांमधून आणि लाभांपासून नाकारले होते, विद्यमान सरकार आता अशा प्रत्येक योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आमदार फुके यांनी सांगितले.

MLC Dr. Parinay Fuke
भाजप, मोदी आजही जवाहरलाल नेहरुंवर टीका का करतात ? ; आमदार परिणय फुके म्हणाले..

आमदार फुके म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार सर्व नगरपरिषदा व नगर पंचायतींना २४ तासांत निधी देण्याचे आश्वासन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. दिलेले आश्‍वासन ते पाळतील, अशी अपेक्षा आहे. पण दिलेल्या अवधीत निधी जमा न झाल्यास दिवाळीपूर्वीच मुंबईत आंदोलन केले जाईल, असा इशारासुद्धा आमदार डॉ. फुके यांनी दिला आहे.

youtube.com/watch?v=RRTBmNh5fOk

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com