आमदारच मटका अड्ड्यावर छापा टाकायला जातो तेव्हा!

वर्धा शहरात अवैध व्यवसायांत वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाल्याची तक्रार..
आमदारच मटका अड्ड्यावर छापा टाकायला जातो तेव्हा!
MLA Pankaj Bhoyarsarkarnama

वर्धा : आमदाराला काय कामे करावी लागतात, हे सांगता येत नाही. पोलिसांच्या नजरेतून सुटलेल्या सट्टापट्टी अड्ड्यावर (मटका अड्डा) आमदार डॉ. पंकज भोयर (Dr. Pankaj Bhoyar) धडकल्याने चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांना आमदारानेच छापा टाकल्याची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून तिघांविरूद्ध गुन्हा नोंद करत 14 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आर्वीनाका परिसरात करण्यात आली. (Wardha Police)

शहरात गत काही वर्षात अवैध व्यवसायाला उधाण आले आहे. यावर आवर घालण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने वेळोवेळी कारवाईही केली जाते. मात्र कारवाईला न जुमानता सुटका होताच पुन्हा अवैध व्यावसाय सुरु केले जाते. याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

MLA Pankaj Bhoyar
Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

आमदार डॉ. पंकज भोयर हे शनिवारी सायंकाळच्या सुमारास आर्वी नाका परिसरात लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान तेथील नागरिकांनी अवैध जुगार अड्यांबाबत माहिती दिली. आमदार भोयर यांनी सट्टापट्टी अड्यावर धडक देत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्यामसुंदर कमलाकिशोर शिंदे (वय 34) रा. एरिकेशन कॉलोनी पिपरी मेघे, शुभम राजू टेभुर्णे (वय 26) रा. इतवारा बाजार, व विक्की जयस्वाल रा. आदिवासी कॉलनी वर्धा यांच्या विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून श्यामसुंदर शिंदे व शुभम टेभुर्णे यांना अटक करण्यात आली आहे. यांच्या ताब्यातून रोख 140 रुपये, सट्टापट्टी आकडे लिहीलेला चार्ट, ताश पत्ते, प्लास्टीक खुर्चा, लोखंडी खुर्चा, फॅन, कुलर, टेबल, स्टूल व अन्य साहित्य असा 14 हजार 290 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

MLA Pankaj Bhoyar
Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

चार महिन्यांत 24 गुन्हे दाखल
आर्वीनाका व आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध स्ट्टापट्टी व्यवसायावर चार महिण्यात 24 वेळा कारवाई करत गुन्हे गाखल करण्यात आले. यापैकी तीन गुन्ह्यात श्यामसुदंर शिदे याला अटक करण्यात आली. असे असताना सुटका झाल्यावर पुन्हा सट्टापट्टी व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस ठाण्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सट्टीपट्टी व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेत सिंदी मेघे, आर्वी नाका, रामनगर या परिसरात कारवाई करण्यात येणार असल्याचे रामनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी सांगितले.

MLA Pankaj Bhoyar
Sarkarnama Open Mic Challenge: पाहा खासदार Imtiaz Jaleel यांची फटकेबाजी

शहरात रस्त्याच्या कडेला पान टपऱ्या, ग्रीन नेट लाऊन रोजगाराच्या नावावर अवैध व्यसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्त्यावर केले गेलेले हे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी रामनगर पोलिस ठाण्याच्या वतीने नोंव्हेंबर व फेब्रुवारी महिण्यात नगर परिषदेला पत्र दिले होते. मात्र या पत्राकडे नगर पालिकेच्या वतीने दुर्लक्ष केले गेल्याने या अवैध व्यवसायांना शह मिळते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.